Drunk and Drive : दारू पिऊन गाडी चालवल्यास आता थेट ड्रायव्हिंग लायसन्स रद्द होणार ?; पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

78
Drunk and Drive : दारू पिऊन गाडी चालवल्यास आता थेट ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द?
Drunk and Drive : दारू पिऊन गाडी चालवल्यास आता थेट ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द?

पुण्यातील वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. दारू पिऊन वाहन चालवल्यास आता थेट ड्रायव्हिंग लायसेन्स रद्द केले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी न्यायालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे. दारू पिऊन वाहन चालवल्याने अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारवाई किंवा दंड करून देखील अपघातांमध्ये घट झालेली नाही. लोक दारू पिऊन गाडी चालवतच आहेत. याची गंभीर देखल घेत पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. (Drunk and Drive)

(हेही वाचा – मराठी लघुकथांना साहित्याच्या जगात स्थान मिळवून देणारे अफलातून लेखक G.A. Kulkarni)

दारू पिऊन वाहन चालवल्यास थेट लायसेन्स रद्द करण्याची परवानगी मिळावी, यासाठी पोलिसांनी न्यायालयाला प्रस्ताव पाठवला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत अनेक भीषण अपघात घडले आहेत. यातील अनेक अपघात दारू पिऊन गाडी चालवल्यामुळे घडल्याचं समोर आलं आहे. कल्याणीनगरमधील पोर्शे कार चालकाने दोन अभियंताला उडवले होते.

६ महिन्यात १६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे

पुण्यात वाढणाऱ्या ड्रिंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या ६ महिन्यात १६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणे यांच्यावर फक्त खटले दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जात होती.

पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर कार अपघात प्रकरणाने देशात एकच संताप उसळला होता. आरोपीला वाचविण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्याचे सुरुवातीला दिसून आले होते. जनक्षोभ वाढताच त्याच यंत्रणांचा सूर आणि नूर पालटला. फरसखाना ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांना काही मद्यपींनी पेटवून दिल्याचे प्रकरण ताजे असताना आता पोलिसांनी याप्रकाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. (Drunk and Drive)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.