भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन्ही देशांच्या डीजीएमओ यांच्या बैठकीत दोन्ही बाजूकडून शस्त्रसंधीचे पालन केले जाईल, असे सांगण्यात आले, मात्र त्यानंतर रात्री ९.३० वाजताच्या सुमारास जम्मूतील सांबा जालंधर या भागात ड्रोन (Drone) उडताना दिसले. भारतीय सैन्याने हे पाडले.
#UPDATE: After the first wave of drone activity and Air Defence fire. Now, No drone activity observed for the past 15 minutes in Samba. https://t.co/wsJnadZGvx
— ANI (@ANI) May 12, 2025
दरम्यान होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट झाल्याचे वृत्त आहे. त्याठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आले. सायरन वाजल्यानंतर संपूर्ण जिल्हा अंधारात गेला. पंजाबमधील अमृतसर, तरनतारन आणि पठाणकोट जिल्हा प्रशासनानेही १३ मे, मंगळवार रोजी शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे, फाजिल्कामध्येही पुढील २ दिवस सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश आहेत.
(हेही वाचा PM Narendra Modi : दहशतवादाला पोसणारे पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी यांना एकाच नजरेत बघणार)
दरम्यान काही तासांच्या आधीच भारतीय लष्कराने सांगितले की, दोन्ही देशांच्या डीजीएमओ चर्चेदरम्यान भारत आणि पाकिस्तान दोघांनीही एकही गोळी झाडली जाणार नाही किंवा कोणतीही आक्रमक कारवाई केली जाणार नाही, अशी वचनबद्धता व्यक्त केली. दोन्ही देशांनी सीमा आणि पुढच्या भागातून सैन्य कमी करण्यावरही सहमती दर्शविली. असे असताना हा अनुभव पुन्हा चक्रावरून टाकणारा वाटत आहे. (Drone)
Join Our WhatsApp Community