Dr. Ghaisas Case : आयएमए, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

589
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास (Dr. Ghaisas Case) यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन (Indian Medical Association, आयएमए) आणि हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. घैसास यांच्यावर पुढील कारवाई झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.
तनिषा भिसे (Tanisha Bhise) यांच्या मृत्यूसाठी डॉ. घैसास यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत अलंकार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. ससून रुग्णालयाच्या (Sassoon Hospital) अहवालात घैसास यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचे नमूद आहे. मात्र, आयएमएचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे (IMA) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. व्ही. असोकन यांनी हा ठपका अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. “रुग्णाला दाखलच केले नसेल तर हलगर्जीपणाचा आरोप कसा? ससूनचा अहवाल एका दिवसात बदलला कसा?” असा सवाल आयएमएने उपस्थित केला.
हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियानेही (Hospital Board of India) डॉ. घैसास यांना पाठिंबा देत सरकारच्या कारवाईला विरोध दर्शविला. “डॉक्टरांवरील अन्यायकारक कारवाईमुळे वैद्यकीय क्षेत्राचे मनोबल खचेल,” असे बोर्डाचे म्हणणे आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी डॉ. घैसास यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.
या घटनेमुळे पुण्यात तणाव वाढला असून, रुग्णालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भिसे कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली असताना, आयएमए आणि हॉस्पिटल बोर्डाच्या आंदोलनाच्या इशाऱ्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.