पुणे पोलिसांनी गुरुवारी, २९ मे २०२५ या दिवशी ससून रुग्णालयाचा माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय तावरे (Dr. Ajit Taware) याला एका नवीन प्रकरणात अटक करण्यात आली आहे. किडनी प्रत्यारोपण रॅकेटशी संबंध असल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे पोर्श प्रकरणात डॉ. अजय तावरे (Dr. Ajit Taware) तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहेत. एक धांडग्या उद्योजकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यप्राशन करून भरधाव गाडी चालवली. तेव्हा त्याने दोन जणांना चिरडून टाकले होते. मात्र त्या मुलाला वाचवण्यासाठी डॉ. तावरे याने मुलाच्या रक्ताचे नमुने बदलले होते. मात्र आता पोलिसांनी रुबी हॉल क्लिनिकच्या किडनी प्रत्यारोपण रॅकेट प्रकरणात तावरे (Dr. Ajit Taware) याला अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा “भारत काय करू शकतो आणि किती अचूकपणे करू शकते हे जगाने पाहिले” ; PM Narendra Modi यांचा पाकला पुन्हा इशारा)
डॉ. तावरे २०२२ मध्ये किडनी प्रत्यारोपणाला मान्यता देणाऱ्या प्रादेशिक प्राधिकरण समितीचा प्रमुख होता. हे प्रकरण मे २०२२ मध्ये उघडकीस आले. त्यावेळी महिलेने किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या व्यक्तीची पत्नी असल्याचा दावा केला होता. महिलेने त्या व्यक्तीला किडनी दान केली. परंतु रुग्णालयात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेदरम्यान महिलेने तिची ओळख उघड केली. त्यावेळी हे प्रकरण चर्चेत आले. यामध्ये किडनी रॅकेट उघड झाले आणि डॉक्टरांचा सहभाग उघड झाला. या प्रकरणात किडनी दान करण्याच्या प्रक्रियेत अनियमितता आढळून आली. (Dr. Ajit Taware)
Join Our WhatsApp Community