-
प्रतिनिधी
मुंबई पोलीस दलात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या गुप्तवार्ता विभागाच्या सह पोलीस आयुक्तपदी (विशेष पोलीस महानिरीक्षक) आरती सिंह यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस दलातील विशेष पोलीस आयुक्त या रिक्त झालेल्या पदाला डाऊनग्रेट करण्यात आले असून त्या जागी गुप्तवार्ता विभाग सुरू करण्यात आला आहे. गुप्तवार्ता विभागामुळे मुंबई पोलीस दलात यापुढे ६ सह पोलीस आयुक्त झाले आहे. (Mumbai Police)
(हेही वाचा – RPF ने केली धडक कारवाई; ‘Operation AAHT’अंतर्गत चार अल्पवयीन मुलींची सुटका)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानच्या वाढत्या तणावामुळे संपूर्ण देशाला दहशतवाद्यांपासून धोका निर्माण झाला आहे. दहशतवादी संघटनांनी भारतातील आपले स्लिपर सेल ला अॅक्टिव्ह केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या स्लिपर सेल पासून सर्वात जास्त धोका मुंबई शहराला आहे. तसेच शहरात अतिमहत्वाच्या व्यक्तींची संख्या खूप मोठी आहे. भारताचे व इतर राष्ट्रांचे राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रप्रमुख, राजे, देशातील इतर महत्त्वाचे केंद्रीय मंत्री यांच्या मुंबई शहरास होणाऱ्या भेटींची संख्या देखील मोठी आहे. त्यांच्या अशा प्रत्येक मुंबई भेटीदरम्यान त्यांचा होणारा मुंबई शहर व आजूबाजूच्या परिसरातील प्रवास व वास्तव्य या दरम्यान त्यांच्या सुरक्षेचे बळकटीकरण करणे व सुक्ष्म पर्यवेक्षण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने मुंबई पोलीस आयुक्त यांच्या अधिपत्याखाली “सहपोलीस आयुक्त, गुप्तवार्ता (Joint Commissioner of Police, Intelligence)” हे पद सुनिश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. (Mumbai Police)
(हेही वाचा – India Tour of England : इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय खेळाडूही मध्यातच आयपीएल सोडणार?)
त्या अनुषंगाने शासनाने शुक्रवारी मुंबई पोलीस दलात गुप्तवार्ता हे पद निर्माण करून यापदासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक (सह पोलीस आयुक्त) या दर्जाच्या अधिकारी २००६ आयपीएस बॅचच्या डॉ. भारती सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. भारती सिंह यांचे सह पोलीस आयुक्त म्हणून मुंबई पोलीस दलात ६ वे पद असणार आहे. यापूर्वी मुंबई पोलीस दलात ५ सह पोलीस आयुक्त आहेत. गुन्हे, प्रशासन, आर्थिक गुन्हे शाखा, वाहतूक, कायदा व सुव्यवस्था यापदावर सहपोलिस आयुक्त दर्जाचे अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. यापुढे गुप्तवार्ता हे पद वाढल्यामुळे मुंबई पोलीस दलात ६ सह पोलिस आयुक्त असणार आहे. मुंबई पोलिस दलाच्या विशेष शाखा हे गुप्तवार्ता विभागाला संलग्न करून विशेषे शाखेचे प्रमुख अप्पर पोलीस आयुक्त हे आहेत, ते पूर्वी कायदा आणि सुव्यवस्था या विभागाचे सह पोलीस आयुक्त यांना अहवाल देत होते मात्र यापुढे विशेष शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त हे सह पोलीस आयुक्त (गुप्तवार्ता ) यांना अहवाल सादर करतील. (Mumbai Police)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community