Dombivli News : घाणीचे साम्राज्य पसरलेल्या एमआयडीसी निवासी विभागात स्थानिकांकडून स्वच्छता मोहिम

143
Dombivli News : घाणीचे साम्राज्य पसरलेल्या एमआयडीसी निवासी विभागात स्थानिकांकडून स्वच्छता मोहिम
Dombivli News : घाणीचे साम्राज्य पसरलेल्या एमआयडीसी निवासी विभागात स्थानिकांकडून स्वच्छता मोहिम

प्रदूषणासह दुर्गंधी, अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरलेल्या डोंबिवली एमआयडीसीच्या (Dombivli MIDC) निवासी विभागातील सार्वजनिक रस्त्यांची पुरेवाट लागली होती. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे या भागातील रहिवाशांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र दुर्लक्ष करण्यात येत असल्याने अखेर शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhari) यांचे चिरंजीव तथा युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक चौधरी (Abhishek Chaudhari) यांनी पुढाकार घेतला. हातात झाडू घेतलेल्या या तरूणाचा पुढाकार पाहून परिसरातील शेकडो हात स्वच्छता मोहिमेला लागले आणि म्हणता म्हणता काही तासांतच सर्व्हिस रोडसह सार्वजनिक रस्ते झाडून साफ झाले. (Dombivli News)

(हेही वाचा – Nagpur Winter Session : पनवेलमधील माणघरच्या जमिनीचा प्रश्न सुटणार; महसूल मंत्री बावनकुळेंचे स्पष्ट निर्देश)

या मोहिमेत परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली निरूपयोगी झुडपे हटविण्यात आली. दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या उद्यानाचीही साफसफाई करण्यात आली. झुडपांसह कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे परिसराला आलेले बकाल स्वरूप दूर करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी प्रभाग १९ मधील रहिवाशांच्या सेवेसाठी कांस्यथाळी फूट मसाजची मोफत सेवा उपलब्ध करून देण्यात आली. या आरोग्यविषयक उपक्रमाचा या भागातील शेकडो रहिवाशांनी लाभ घेतला. या कार्यक्रमांना परिसरातील रहिवाशांसह शिवसेनेच्या युवा पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी हे देखिल उपस्थिती होते. (Dombivli News)

स्वच्छतेसाठी संदेशात्मक फलक

एमआयडीसीच्या निवासी विभागातील रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. काही ठिकाणी कचरा टाकला जात असल्याने परिसर अस्वच्छ झाल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या तक्रारींची तात्काळ दखल घेत शनिवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झुडपांची छाटणी आणि उद्यानाची स्वच्छता करण्यात आली असून, भविष्यात येथे कोणीही कचरा टाकू नये, यासाठी संदेशात्मक फलक लावण्यात येणार आहेत. परिसर कायमस्वरूपी स्वच्छ व सुशोभित रहावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील. पुढील काळातही शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक व जनहिताचे कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिषेक चौधरी यांनी उपस्थित रहिवाशांशी संवाद साधताना सांगितले. (Dombivli News)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.