Income Tax Return : आता डिसेंबर ३१ पर्यंत आयटीआर फाईल करता येणार

करदात्यांनी अंतिम मुदत वाढविण्याची विनंती केली होती

174
Income Tax Return : आता डिसेंबर ३१ पर्यंत आयटीआर फाईल करता येणार

प्राप्तिकर विभागाने आयटीआर फाईल (Income Tax Return) करण्यासाठी ३१ जुलै २०२३ ही अंतिम तारीख दिली होती. तारखेनंतर देखील पाच हजार रुपये दंड भरून ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत करदाता आपला आयटीआर फाईल करू शकत होता. मात्र आता ३१ डिसेंबर पर्यंत आयटीआर फाईल करण्यासाठी करदात्यांना आता कोणताही दंड भरावा लागणार नसल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. प्राप्तिकर विभागाने (Income Tax Department) याविषयीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ३१ जुलै नंतरही कोणत्याही दंडाशिवाय आयटीआर फाईल करता येणार आहे.

(हेही वाचा – Covid Centre scam : माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल)

… म्हणून घेतला हा निर्णय

यावर्षी मुसळधार पावसाने संपूर्ण देशात हाहाकार माजवला. अणे ठिकाणी इंटरनेट, वीज यंत्रणा कोलमडली. त्यामुळे अनेक करदात्यांना वेळेत प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) दाखल करता आला नाही. म्हणून करदात्यांनी अंतिम मुदत वाढविण्याची विनंती केली होती. पण केंद्र सरकारने ही तारीख वाढवली नाही. सध्या आयटीआर फाईल करणाऱ्या करदात्यांना कोणताच दंड भरावा लागणार नाही, असे आयकर खात्याने स्पष्ट केले आहे.

‘या’ करदात्यांना दंड भरावा लागणार नाही

ज्या करदात्यांचे (Income Tax Return) एकूण उत्पन्न मुळ सवलत मर्यादेपेक्षा अधिक नाही, अशा करदात्यांना हा दिलासा मिळाला आहे. त्यांनी उशीरा आयटीआर फाईल केला तरी त्यांना कोणताही दंड द्यावा लागणार नाही. आयकर अधिनियमाच्या कलम 234F मध्ये याविषयीची सवलत देण्यात आली आहे.

हेल्पलाईन क्रमांक

1800 103 0025 1800 419 0025 +91-80-46122000 +91-80-61464700

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.