Dnyanpith Award : ५८वा ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

Dnyanpith Award :     ५८वा Dnyanpith Award सोहळा शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

33

Dnyanpith Award :     ५८वा Dnyanpith Award सोहळा शुक्रवार, १६ मे २०२५ रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्कृत विद्वान जगद्गुरू रामभद्राचार्य यांना ५८ वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रकृति अस्वास्थ्यामुळे प्रसिध्द गीतकार, कवी गुलजार पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू न शकले नाहीत. पुरस्कार विजेत्यांचे राष्ट्रपती मुर्मूंनी अभिनंदन देखील केले.

(हेही वाचा ‘Operation Sindoor’ अजून संपलेले नाही ‘हा’ फक्त एक ट्रेलर होता, पूर्ण चित्रपट अजून बाकी आहे; राजनाथ सिंह यांचा पाकला इशारा )

दरम्यान, Dnyanpith Award २०२३ साठी प्रसिद्ध उर्दू कवी गुलजार यांची निवड करण्यात आली होती. त्यासोबतच संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरू रामभद्राचार्य यांचीही पुरस्कारासाठी निवड झाली होती. सोहळ्यास उपस्थित राहू न शकलेल्या गुलजार यांना पूर्णपणे निरोगी होऊन सक्रिय व्हावेत आणि कला, साहित्य, समाज आणि देशासाठी योगदान देत राहावे अशी इच्छा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली.

राष्ट्रपती मुर्मू नेमकं काय म्हणाल्या?

साहित्य समाजाला एकत्र आणते आणि जागृत करते. १९ व्या शतकातील सामाजिक जागृतीपासून ते २० व्या शतकातील आपल्या स्वातंत्र्यलढ्यापर्यंत, कवी आणि लेखकांनी लोकांना जोडण्यात मोठी भूमिका बजावली आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले ‘वंदे मातरम’ हे गीत जवळजवळ १५० वर्षांपासून भारतमातेच्या मुलांना जागृत करत आहे आणि नेहमीच करत राहील. वाल्मिकी, व्यास आणि कालिदासांपासून ते रवींद्रनाथ टागोरसारख्या शाश्वत कवींच्या कृतींपर्यंत, आपल्याला जिवंत भारताची नाडी जाणवते. ही नाडी भारतीयतेचा आवाज आहे, असे राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या.

भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टचे राष्ट्रपतींकडून कौतुक

१९६५ पासून विविध भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यिकांना पुरस्कार दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टचे कौतुक केले. भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्यिकांना पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेत, भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराच्या निवडकर्त्यांनी सर्वोत्तम साहित्यिकांची निवड केली आहे आणि या पुरस्काराची प्रतिष्ठा जपली आहे आणि ती वाढवली आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.Dnyanpith Award

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.