-
प्रतिनिधी
राज्यात सुरू असलेल्या रेशन कार्ड ई-केवायसी मोहिमेने बोगस लाभार्थ्यांवर जबरदस्त डिजिटल स्ट्राईक केला आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल १८ लाख बोगस रेशन कार्ड रद्द करण्यात आली असून, आणखी १.६५ कोटी कार्डांची छाननी सध्या सुरू आहे.
या मोहिमेमुळे फक्त बोगस लोकांचीच नव्हे तर मुंबई, ठाणे परिसरात बेकायदेशीररीत्या स्थायिक झालेल्या बांगलादेशी घुसखोर नागरिकांचीही (Bangladeshi Infiltrators) बोगस कागदपत्रे उघडकीस येत आहेत. मुंबईत सर्वाधिक ४.८० लाख कार्ड रद्द झाली असून, ठाण्यात १.३५ लाख कार्डांचे रद्दबातल करण्यात आले आहे. त्यामुळे या मोहिमेने घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे धान्याचा लाभ घेणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचे (Bangladeshi Infiltrators) धाबे दणाणले आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. बोगस लाभार्थ्यांमध्ये मोठ्या पगाराचे सरकारी नोकरदार, व्यावसायिक, व्यापारी आणि श्रीमंतांच्या नावांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.
भंडारा, गोंदिया, सातारा हे जिल्हे ई-केवायसी मोहिमेत आघाडीवर असून, मुंबई, पुणे, ठाणे मागे राहिले आहेत. अंतिम मुदत संपल्याने सरकारने मोहिमेचा वेग वाढवण्याचे आदेश दिले असून, शासनाच्या पुढील आदेशापर्यंत ई-केवायसी सुरूच राहणार आहे.
(हेही वाचा – तुर्कीवरील बहिष्काराच्या प्रश्नावर Congress प्रवक्त्यांकडून टाळाटाळ; व्हिडिओ झाला व्हायरल, भाजपाने साधला निशाणा)
या मोहिमेमुळे राज्य सरकारच्या अन्न सुरक्षेतील गैरवापरावर जोरदार लगाम बसेल आणि पात्र गरजूंनाच लाभ मिळेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. राजकीय वर्तुळातही या मोहिमेने चर्चेला उधाण आले असून, सामाजिक सुरक्षेच्या आड सरकारी योजनांचा बेमालूम गैरवापर करणाऱ्या राक्षसी टोळ्यांना चपराक बसली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community