
बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri ) हे सध्या बिहारमध्ये आहेत. बिहारमध्ये (Bihar) धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri ) हनुमान कथेची पारायणं चालू आहेत. या कथावाचनाच्या कार्यक्रमांना काही लोकांकडून विरोध होत आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना, ते म्हणाले की, ज्यांना रामाच्या नावाची अडचण आहे. तेच लोक कार्यक्रमाला विरोध करत आहेत. मात्र याचा अर्थ असा नाही की आम्ही हा विरोध पाहून आमचं काम थांबवू. आमचं काम चालूच राहिल. राष्ट्रीय जनता दलाचे आमदार खालिद अन्वर (Khalid Anwar) आणि पूर्णियाचे खासदार पप्पू यादव (Pappu Yadav) या कथावाचनाच्या कार्यक्रमाला विरोध करत आहेत.”
( हेही वाचा : Champions Trophy Final : चॅम्पियन्स करंडकाच्या बक्षीस सोहळ्यात पाक बोर्डाचे प्रतिनिधी नसल्यावरून वाद)
दरम्यान बिहारच्या (Bihar) गोपालगंजमधील हुस्सेपूर गावातील रामनगर मठात सुरु असलेल्या हनुमान कथेला विरोध केल्याबद्दल धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, “हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार। ज्यांना भुंकायचं आहे त्यांनी खुशाल भुंकत बसावं, आम्हाला त्यांच्या भुंकण्याने काहीच फरक पडणार नाही.” तसेच त्यांनी लवकर देशभर पदयात्रा करणार असल्याचे सांगितले. उत्तर प्रदेशमधून या यात्रेची सुरुवात होईल. यूपीपाठोपाठ आमची यात्रा बिहारमध्ये दाखल होईल. ही केवळ साधीसुधी यात्रा नसेल. या यात्रेद्वारे हिंदू समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. ती यात्रा हिंदू एकतेचं प्रतीक असेल. हिंदू राष्ट्राच्या दिशेने पुढे सरसावण्यासाठी समाज संघटित होणं गरजेचं आहे. त्यासाठीच आम्ही हे सगळे प्रयत्न करत आहोत.
तसेच बिहारपासून हिंदू राष्ट्राच्या (Hindu nation) निर्मितीची प्रक्रिया सुरू होईल, असं म्हणत धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Krishna Shastri ) यांनी पुन्हा एकदा अखंड भारताचा नारा दिला. आम्हाला अखंड भारत हवा आहे, असं ते म्हणाले. यावेळी कागदावर नव्हे तर हिंदूंच्या हृदयात हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. जेणेकरून सनातन (Sanatan) , संत व हिंदूंकडे कोणीही बोट दाखवू नये. हिंदूंची मंदिरं सुरक्षित राहायला हवीत. मंदिरं कोणीही तोडू शकणार नाही, असे ही शास्त्री म्हणाले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community