DGP Rashmi Shukla : नव्या पोलीस महासंचालकांचा आत्मविश्वास आणि नवीन उमेद बघून सर्वच अवाक झाले

राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी (९ जानेवारी) पदभार स्वीकारला.दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना समोरे जाताना शुक्ला यांच्यातील आत्मविश्वास आणि नव्या उमेदीने काम करण्याची धडपड दिसून आली.

175
DGP Rashmi Shukla : नव्या पोलीस महासंचालकांचा आत्मविश्वास आणि नवीन उमेद बघून सर्वच अवाक झाले
DGP Rashmi Shukla : नव्या पोलीस महासंचालकांचा आत्मविश्वास आणि नवीन उमेद बघून सर्वच अवाक झाले
  • मुंबई,संतोष वाघ

राज्याचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी मंगळवारी (०९ जानेवारी) पदभार स्वीकारला. दरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांना समोरे जाताना शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यातील आत्मविश्वास आणि नव्या उमेदीने काम करण्याची धडपड दिसून आली. त्यांच्या हा आत्मविश्वास आणि राज्यात नव्या उमेदीने काम करण्याची धडपड बघून पत्रकाराच नाही तर पोलीस दलातील त्यांचे सहकारी देखील अवाक झाले. (DGP Rashmi Shukla)

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा मागील दोन वर्षांचा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण गेला. महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Govt) काळात त्यांच्यावर फोन टॅपिंगचे कथित आरोप लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कालावधीत शुक्ला (Rashmi Shukla) यांना खूप कठीणाईचा सामना करावा लागला, केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी यांच्यावरील दाखल झालेले गुन्हे गेल्या महिन्यात, मुंबई उच्च न्यायालयाने त्याच्याविरुद्ध पुणे आणि मुंबई येथे नोंदवलेल्या तीन गुन्ह्यांपैकी दोन रद्द केले होते. महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकार (Eknath Shinde-Devendra Fadnavis Govt) सत्तेवर आल्यानंतर तिसरे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले. सीबीआयच्या (CBI) क्लोजर रिपोर्टला न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर हा खटला नंतर बंद करण्यात आला आणि त्याचा राज्यात परतण्याचा मार्ग मोकळा झाला. (DGP Rashmi Shukla)

(हेही वाचा – Amazon Lay-off : ॲमेझॉन कंपनी ५०० जणांना नोकरीवरून काढण्याच्या तयारीत)

या दोन वर्षांच्या खडतर प्रवासातून बाहेर पडलेल्या जेष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुख पदी १ जानेवारी रोजी नियुक्ती करण्यात आली. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ठरल्या. ०९ जानेवारी रोजी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी राज्य पोलीस दलाची कमान हाती घेत आयोजित पत्रकार परिषदेला सामोरे गेल्या. यापूर्वी होऊन गेलेल्या पोलीस महासंचालकांना एवढ्या आत्मविश्वासाने पत्रकारांना सामोरे गेल्याचे बघण्यात आले नव्हते. मात्र रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा हा आत्मविश्वास बघून त्यांचे पोलीस दलातील सहकारी आणि पत्रकार देखील अवाक झाले. जुने सर्व विसरून नव्या उमेदीने, आत्मविश्वासाने रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नांची शांतपणे उत्तरे दिली. (DGP Rashmi Shukla)

शुक्ला (Rashmi Shukla) यांच्या चेहऱ्यावर तणावाचा एकही लवलेश पत्रकार परिषदेत दिसून आला नाही. पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांनी प्रत्येक पत्रकराशी त्या हस्तांदोलन करीत अगदी आपुलकीने त्यांच्याशी सवांद साधत, तुम्ही कधीही मला भेटायला येऊ शकतात असे बोलत शुक्ला (Rashmi Shukla) यांनी उपस्थित पत्रकारांशी मने जिंकली. पत्रकार परिषद संपल्यानंतर रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा मागील दोन वर्षांचा काळ आठवत, त्यांचा आत्मविश्वास बाबत तसेच ज्या नवीन उमेदीने त्या राज्याच्या पोलीस प्रमुखपदी रुजू झाल्या त्या बद्दल पत्रकारांमध्ये चर्चा सुरू होती. (DGP Rashmi Shukla)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.