वीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वीर सावरकर (Veer Savarkar) यांना अभिवादन केले आहे. त्यांनी एक्स आणि फेसबूकवर पोस्ट करत सावरकरांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे.
(हेही वाचा – वीर सावरकरांचा त्याग राष्ट्रासाठी प्रेरणादायक; Amit Shah यांची एक्सवर भावूक पोस्ट)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ मे या दिवशी मुंबई येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी भारत मातेचे थोर सुपुत्र, जाज्वल्य हिंदुत्वाचे जनक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
हे मातृभूमी तुझसाठी मरण ते जनन,
तुझविण जनन ते मरण…🚩CM Devendra Fadnavis humbly offered floral tributes to the greatest son of Bharat Mata, SwatantryaVeer Vinayak Damodar Savarkar, on his birth anniversary at his official residence in Mumbai today.
🚩मुख्यमंत्री देवेंद्र… pic.twitter.com/J7mlyhcHpJ— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 28, 2025
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या फेसबूक खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये २७ मे या दिवशी झालेल्या छोटेखानी सोहळ्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. फेसबूकवर त्यांनी म्हटले आहे की, अनादि मी, अनंत मी या गीताचे एक हिंदी अनुवादित गीत तयार करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते तल्लीन होऊन ऐकले.
‘अनादि मी अनंत मी…’ या गीताला २७ मे २०२५ या दिवशी वर्षा निवासस्थानी प्रदान करण्यात आला. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळालेला हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांचे नातू रणजित सावरकर आणि नात असिलता सावरकर-राजे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, आमदार संजय उपाध्याय, सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सहकार्यवाह स्वप्निल सावरकर, स्मारकाचे अस्थायी विश्वस्त अविनाश धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
अनादी मै, अनंत मै हे गीत अनादी मी अनंत मी या गीताचे हिंदी रूपांतरण आहे. याचे कवी आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर. हिंदी गीताची निर्मिती दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने केली आहे. गीताचा हिंदी अनुवाद वीर सावरकरांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केला आहे, तर निर्मिती संयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले आहे. या गीताला संगीत वर्षा भावे यांनी दिले आहे. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले आहे, तर जयदीप वैद्य यांनी हे गीत गायले आहे. या गीताच्या व्हिडिओसाठी छायाचित्रण सतीश गरुड यांनी, तर ध्वनिचित्र संकलन दिनेश भात्रे आणि रोहित अडसुर यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community