पुढील १०० वर्षांपर्यंत शिवरायांचा पुतळा दिमाखात उभा राहणार; Devendra Fadnavis यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण

Devendra Fadnavis : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले.

63

Devendra Fadnavis : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिध्द शिल्पकार पद्मभूषण राम सुतार यांनी ९१ फुट उंची छत्रपती शिवाजी महाराजांचा दिमाखदार पुतळ्याची निर्मिती केली आहे. पुढील १०० वर्षांपर्यंत कुठल्याही वातावरणात छत्रपती शिवरायांचा पुतळा दिमाखात उभा राहणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

(हेही वाचा Trirashmi Caves : त्रिरश्मी लेण्या सांगतात बुद्ध व जैन समाजाचा इतिहास! वाचा काय आहे सत्य? )

छत्रपती शिवाजी महाराजांचं दिमाखदार तेजस्वी पुतळा हा स्वाभिमानी आणि भव्यतेने उभारण्यात आला आहे. मागच्या वेळेस पुतळ्यासंदर्भात दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर आमच्या सरकारने अक्षरशः विक्रमी वेळेत प्रस्थापित केला आहे. पुतळ्याच्या उभारणीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभिनंदन केले. छत्रपती शिवरायांचा देशातला आतापर्यंतचा सर्वात उंच पुतळा असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

आयआयटी अभियंते, जे.जे. स्कूल ऑफ आर्टचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या पुतळ्याचं डिझाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर, कोकण किनारपट्टीवर तौख्ते, फयान चक्रीवादळं आली त्याने प्रभावित न होता शिवरायांचा पुतळा तग धरू राहील, याचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे. कुठल्याही प्रकारच्या वातावरणात पुतळा टिकू शकेल, याचा विचार करण्यात आला आहे. पुतळ्याच्या आसपासचा परिसरात आल्यानंतर शिवरायांच्या स्वराज्याचा अनुभव चांगल्या प्रकारने मिळण्याकरिता उपाययोजना करण्यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली.

कोकणचा विकास करणं महायुती सरकारची प्राथमिकता – मुख्यमंत्री फडणवीस

पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कोकणचा अधिकाधिक विकास करणे याकरिता महायुती सरकारचे प्रयत्न असतील. महायुतीच्या अजेंड्यावर कोकणात प्राथमिकता असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकाळात असो कोकणाला झुकतं माप देण्याचा काम आम्ही मागील काळापासून करतोय. कोकणकरिता जास्तीचं देण्याचा प्रयत्न करणे ही महायुती सरकारची भूमिका असेल, असे मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी यावेळी सांगितले.Devendra Fadnavis

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.