Worli BDD Chawl : वरळीत तीन आमदार तरीही, बीडीडीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य

179
Worli BDD Chawl : वरळीत तीन आमदार तरीही, बीडीडीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य
Worli BDD Chawl : वरळीत तीन आमदार तरीही, बीडीडीच्या परिसरात घाणीचे साम्राज्य

वरळी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे तसेच सचिन अहिर आणि सुनील शिंदे हे तीन आमदार असतानाही वरळी बीडीडी चाळीमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या बीडीडी चाळीच्या परिसरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून स्वच्छता रावबली जाते. परंतु या मतदार संघांमध्ये तीन आमदार असतानाही या भागातील रहिवाशांना घाणीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भागातील आमदार येथील रहिवाशांना घाणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे बीपीटी आणि एसआरए योजनांमधील इमारतींमध्ये अस्वच्छतेची पाहणी करून स्वच्छता राबवण्यासाठी महापालिकेला धारेवर धरणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाला लावून बीडीडी इमारतींचा परिसर स्वच्छ करतील का असा सवाल आता रहिवाशांकडून केला जात आहे. (Worli BDD Chawl)

New Project 4 1

वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जात असून याकाही इमारती या तोडण्यात आल्या आहेत. तर काही इमारतींमध्ये आजही रहिवाशी राहत आहेत. यातील बीडीडी चाळ क्रमांक ९३, १५, १०२ आणि ७२ या इमारतींच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मागील अनेक दिवसांपासून याठिकाणी सफाई कामगार येत नसल्याने या भागांमध्ये पाणी आणि कचऱ्यानेमुळे दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे या भागांमध्ये मोठ्याप्रमाणात डासांचा प्रादुर्भाव होत आहे. परिणामी रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रहिवाशांकडून सोशल माध्यमातून जोरदार नाराजी व्यक्त केली जात आहे. (Worli BDD Chawl)

New Project 5 1

वरळी विधानसभेचे आमदार हे उबाठा शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे हे आहेत. तर सचिन अहिर आणि सुनील अहिर हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. त्यामुळे या एकाच विधानसभा मतदार संघात तीन आमदार असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या बीपीटीच्या जागेवर योग्यप्रकारे स्वच्छता राखली जात नाही. या भागात आदित्य ठाकरे, सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांचे लक्ष नसून महापालिकेची हद्द नसल्याने या भागांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून सेवा दिली जात नाही. त्यामुळे ज्या बीपीटी आणि कुर्ला परिसरातील एसआरए प्रकल्पांतील इमारतींच्या परिसरात स्वच्छतेची पाहणी करून महापालिकेला स्वच्छता राखण्याचे निर्देश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याच सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कामाला लावून या भागांमध्ये स्वच्छता राबवण्यासाठी प्रयत्न करणार का असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे. (Worli BDD Chawl)

New Project 6 1

(हेही वाचा – Gram Panchayat Election : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा ‘धुरळा’; ५ नोव्हेंबरला मतदान)

मनसेचे विभागप्रमुख संतोष धुरी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, या भागांमध्ये महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता राखली जात नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जबाबदारी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आमदारांनी ही स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करायला हवे. परंतु या तिन्ही आमदारांकडून जाणीवपूर्वक या भागांमध्ये स्वच्छता राखली जात नाही, कारण त्यांना येथील रहिवाशांना घाणीमध्ये ठेवायचे आहे. येथील काही रहिवाशी हे या प्रकल्पाला समर्थन देत नाही, त्यामुळे जाणीवपूर्वक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरु आहे. जेणेकरून या घाणीला कंटाळून ते या प्रकल्पाला पाठिंबा देतील. त्यामुळे जर आमदार या भागांमध्ये स्वच्छता राखत नसतील तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश देत या सर्व परिसरांमध्ये स्वच्छता राखण्यास भाग पाडावे,अशी सूचना धुरी यांनी केली आहे. (Worli BDD Chawl)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.