कर्जवाटप योजनेच्या नावाखाली Fraud करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

40
कर्जवाटप योजनेच्या नावाखाली Fraud करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
  • प्रतिनिधी

कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जवाटप योजनेच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून एलओआय (LOI) म्हणजेच प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पैसे उकळणाऱ्या भामट्यांविरोधात तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्याचे जाहीर केले.

भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत उघड केला प्रकार

भाजपा प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, “महामंडळाच्या नावाखाली होत असलेल्या फसवणुकीचे (Fraud) प्रकार समोर येत असून, काही फसवणूकप्रकरणी आपण स्वतः कराड येथे तक्रार दाखल केली आहे. लाभार्थ्यांना लोभ दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.” या पत्रकार परिषदेला भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, पोपटराव देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – IPL 2025, Virat Kohli : बंगळुरूच्या जितेश शर्माने सांगितले विराट कोहलीने त्याला दिलेले फलंदाजीचे ३ मंत्र)

सीएससी केंद्रांचे परवाने रद्द करण्याची मागणी

पाटील यांनी स्पष्ट केले की, “फसवणूक (Fraud) करणाऱ्या केंद्र सरकारच्या सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) केंद्रांचे परवाने जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित रद्द करावेत. महामंडळाच्या कोणत्याही योजनेसाठी प्रमाणपत्र देताना लाभार्थ्यांकडून पैसे घेतले जात नाहीत. आमच्या सर्व योजना पूर्णपणे ऑनलाइन असून, पारदर्शक पद्धतीने राबवल्या जातात.”

महामंडळाच्या योजनेचा मोठा प्रभाव

आजवर १ लाख ३८ हजार लाभार्थ्यांनी या योजनेच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. तब्बल ११ हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले असून, १ हजार कोटींपेक्षा अधिक व्याज परतावा महामंडळाने लाभार्थ्यांना दिला आहे.

(हेही वाचा – पाकिस्ताननंतर आता Bangladesh ला आली भारतविरोधात खुमखुमी; चीनचे तळवे चाटत युनूस सरकार कोणता रचतोय डाव? )

लाभार्थ्यांनी राहावे सतर्क

पाटील यांनी आवाहन केले की, “योजनेच्या वाढत्या व्याप्तीमुळे काही फसवणूक (Fraud) करणारी टोळी सक्रिय झाली आहे. गरजू लाभार्थ्यांनी सावध राहावे आणि कुठल्याही प्रकारची मागणी झाल्यास तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. कुणी फसवणूक केली असल्यास लाभार्थ्यांनी स्वतःहून ठकसेनांविरोधात पोलीस तक्रार दाखल करावी.”

फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई आणि लोकजागृतीचे आवाहन

“या प्रकारांमुळे गरजू मराठा तरुणांना होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्यासाठी शासनाने कठोर कारवाई करावी आणि जनतेत जागरूकता निर्माण करावी,” अशी ठाम भूमिका नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.