
नवी दिल्लीतील (Delhi Building Collapse) मुस्तफाबाद परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळाने इमारत कोसळली. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत अन्य ११ जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त करत चौकशीचे आदेश दिले आहेत. (Delhi Building Collapse)
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशमन दल, दिल्ली पोलीस तसेच इतर स्वयंसेवक सुमारे १२ तास चाललेल्या बचावकार्यात सहभागी झाले. त्यांना ढिगाऱ्याखालून ११ जणांना बाहेर काढण्यात यश आले. सर्व जखमींना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Delhi Building Collapse)
हेही वाचा- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुर्गम भागांत आरोग्य सेवा पोहोचवा; CM Devendra Fadnavis यांचे आवाहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या २० वर्षे जुन्या इमारतीमध्ये एकूण २२ जण राहत होते, त्यापैकी बहुसंख्य कुटुंबे आहेत. इमारतीचे मालक तेहसीन आणि त्यांच्या कुटुंबामधील अन्य सहा जणांचा मृतांमध्ये समावेश आहे. इमारतीच्या तळमजल्यावरील दोन ते तीन दुकानांमध्ये बांधकाम सुरू असल्याने इमारत कोसळली असावी असा अंदाज पोलिसांमधील सूत्रांनी व्यक्त केला. तर, इमारतीच्या भिंतींमध्ये अनेक वर्षांपासून सांडपाणी झिरपत असल्याने त्याचा पाया कमकुवत होऊन इमारतीला तडे गेले होते असे सलीम अली या रहिवाशाने सांगितले. (Delhi Building Collapse)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community