‘मृत्यू क्लेशदायक, रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत!’; रेल्वे अपघातावर उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची प्रतिक्रिया

48
'मृत्यू क्लेशदायक, रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत!'; रेल्वे अपघातावर उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची प्रतिक्रिया
  • प्रतिनिधी

मध्य रेल्वेच्या कसारा-CSMT फास्ट लोकलमध्ये घडलेल्या भीषण अपघातामुळे राज्यात हळहळ व्यक्त होत असतानाच, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या दुर्घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त करत प्रशासनाला तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.

“दुर्घटनेत प्रवाशांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. या घटनेमुळे उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे,” असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टपणे नमूद केले.

(हेही वाचा – )

‘प्रशासनाने आता झोपेतून उठण्याची वेळ आली आहे!’ – उपमुख्यमंत्र्यांचा टोला

अजित पवार (Ajit Pawar) यांनी जोरदार शब्दांत रेल्वे प्रशासनाला उद्देशून सांगितले की, “उपनगरीय रेल्वेसेवा ही मुंबईच्या लाखो नागरिकांची जीवनवाहिनी आहे. ही सेवा अधिक प्रभावी व सुरक्षित करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दिवंगतांना श्रद्धांजली, जखमींसाठी प्रार्थना

अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांच्या प्रकृतीत जलद सुधारणा व्हावी अशी प्रार्थनाही पवार (Ajit Pawar) यांनी केली. तसेच, “मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुर्घटनेने मन हेलावून गेलं आहे. दिवंगत प्रवाशांना दु:खद अंत:करणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दांत त्यांनी संवेदना व्यक्त केल्या.

(हेही वाचा – )

राज्य सरकारचा रेल्वे प्रशासनावर दबाव वाढणार?

या अपघातानंतर उपमुख्यमंत्र्यांनी (Ajit Pawar) घेतलेली स्पष्ट भूमिका ही मुंबईतील लोकल व्यवस्थापनावर दबाव निर्माण करणारी ठरू शकते. दररोज कोट्यवधी प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मुंबई लोकलमध्ये वाढती गर्दी, अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि प्रवाशांच्या समस्यांकडे होणारे दुर्लक्ष हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत.

रेल्वे प्रशासन तातडीने या दुर्घटनेची दखल घेऊन, उपाययोजना करेल का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्वतः पुढे येऊन आवाज उठवल्याने हा विषय आता राजकीयदृष्ट्याही अधिक गाजण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.