-
प्रतिनिधी
इयत्ता ११ वीच्या प्रवेशासाठी नोंदणी अजूनही पूर्ण झालेली नाही? काळजी नको! शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देत नोंदणीसाठी मुदत ५ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाढवली आहे. विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा देणारी ही घोषणा प्राचार्य शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी सोमवारी अधिकृतपणे केली. (11th Online Admission)
इन-हाऊस कोट्यातील महत्त्वाचा बदल; म्हणून दिली मुदतवाढ
या निर्णयामागील महत्त्वाचे कारण म्हणजे ३१ मे २०२५ रोजी शासनाने दिलेले सुधारित आदेश, ज्यामध्ये इन-हाऊस कोट्याच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. या आदेशानुसार, खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा इन-हाऊस कोट्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई शहर, उपनगर व ठाणे येथे एकाच संस्थेच्या शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये एक युनिट म्हणून ग्राह्य धरली जातील, तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये महसूली जिल्हानिहाय युनिटचे नियोजन करण्यात आले आहे. (11th Online Admission)
(हेही वाचा – ICC Rule Change : जूनपासून आयसीसीच्या नियमांमध्ये होणार ‘हे’ बदल)
विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी
या बदलांनुसार कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या शाळांचा संदर्भ बदलू शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनाही त्यांचा इन-हाऊस पसंतीक्रम अद्ययावत करण्याची गरज भासू शकते. म्हणूनच विद्यार्थ्यांना आणि पालकांना पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने ही मुदतवाढ दिली आहे. (11th Online Admission)
नोंदणीचा आकडा १०.८५ लाख पार!
२ जून २०२५ रोजी सायंकाळपर्यंत एकूण १०,८५,८५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे. विभागनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे :
- मुंबई विभाग : २,६५,९००
- पुणे विभाग : १,८७,९२५
- कोल्हापूर विभाग : १,०७,०१२
- नाशिक विभाग : १,१२,१०८
- छ. संभाजीनगर विभाग : १,००,०४०
- नागपूर विभाग : ९५,२१०
- अमरावती विभाग : ९८,३५९
- लातूर विभाग : ५८,५८६
- इतर : ६१,७१२
नोंदणी अजून केली नाही? ही आहे अंतिम संधी!
https://mahafyjcadmissions.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थी व पालकांनी लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवेश प्रक्रियेचे उर्वरित वेळापत्रक यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणेच राहील. (11th Online Admission)
(हेही वाचा – Shivaji Park : ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या बातमीची दखल; छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसराची स्वच्छता यांत्रिक झाडूद्वारेच)
अधिक माहितीसाठी संपर्क :
- ईमेल : [email protected]
- हेल्पलाइन : 8530955564
हेही पहा –
Join Our WhatsApp Community