मुंबईतील कुर्ला, चांदीवली आणि मिठी नदी परिसरातील झोपडपट्ट्यांना दिलासा; DCM Eknath Shinde यांच्याकडून तातडीने उपाययोजनांचे निर्देश

दरडप्रवण भागांतील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'सुरक्षा कवच'; पीएपी इमारतींसह रुग्णालयासाठीही दिले तातडीचे आदेश

550
मुंबईतील कुर्ला, चांदीवली आणि मिठी नदी परिसरातील झोपडपट्ट्यांना दिलासा; DCM Eknath Shinde यांच्याकडून तातडीने उपाययोजनांचे निर्देश
  • प्रतिनिधी

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दरडप्रवण आणि अतिधोकादायक भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेला त्यांनी सुरक्षा जाळ्यांचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, अशा भागांतील नागरिकांचे पुनर्वसन एसआरए व म्हाडा प्रकल्पांत करण्यासाठी धोरण तयार करण्याचेही आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कुर्ला विधानसभा क्षेत्रातील समस्यांवरील आढावा बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, दिलीप लांडे, तसेच मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे अधिकारी, एमएमआरडीए, एसआरए आणि म्हाडा यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – भाजपाच्या नेत्याचा Aditya Thackeray यांच्यावर आरोप; म्हणाले, पर्यावरण मंत्री असताना…)

दरडप्रवण झोपडपट्ट्यांसाठी विशेष उपाययोजना

चुनाभट्टी, चांदीवली आणि इतर भागांत दरड कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, या ४२ झोपडपट्ट्यांमध्ये सुरक्षा जाळ्या बसवण्याचे काम मदत व पुनर्वसन विभागाच्या निधीतून पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, धोकादायक भागांलगत असलेल्या एसआरए व म्हाडा प्रकल्पांतील घरांत पुनर्वसन शक्य आहे का यावर धोरणात्मक निर्णय घेण्यास सांगण्यात आले.

(हेही वाचा – करमाळ्याचे माजी आमदार जयंतराव जगताप यांचा Shiv Sena मध्ये प्रवेश; सोलापूरमध्ये राजकीय भूकंप)

चांदीवली पीएपी इमारतींसाठी तातडीच्या दुरुस्तीचे आदेश

एमएमआरडीएने बांधलेल्या चांदीवलीतील पीएपी इमारतींमध्ये छत गळती, वीज वायरिंग, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व पाणीपुरवठ्याच्या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. यावर उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी तातडीने दुरुस्ती करण्याचे आणि ‘मिसिंग लिंक’चे काम 10 दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिले.

(हेही वाचा – Amazon वर हिंदूंच्या श्रद्धा दुखावणाऱ्या पुस्तकाची विक्री; मुखपृष्ठावर कालीमातेचे अपमानास्पद चित्र)

नवीन रुग्णालय सुरू करण्याचे आदेश

पीएपी वसाहतीतील पूर्ण झालेले पण वापरात नसलेले 650 बेडचे रुग्णालय मुंबई महापालिकेला हस्तांतरित करून ते सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी दिले. तसेच संघर्षनगर येथील नवीन मनपा रुग्णालयाच्या रखडलेल्या कामासाठी नव्या निविदा काढण्याचे आणि दोषी कंत्राटदारांना बदलण्याचे निर्देश त्यांनी आयुक्तांना दिले. दरडप्रवण भागातील रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी शिंदेंनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. मुंबईतील गरजू नागरिकांसाठी पुनर्वसन, सुरक्षा आणि आरोग्यसेवा यामध्ये ठोस पावलं उचलण्याचा निर्धार या बैठकीत दिसून आला. येत्या काही आठवड्यांत अनेक ठिकाणी बदल प्रत्यक्षात दिसण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.