DCM Eknath Shinde यांचा आपत्ती व्यवस्थापनावर भर; म्हणाले, राजकारण करणाऱ्यांना…

९.५ कोटी नागरिकांना अलर्ट, रेड अलर्टसह राज्य सज्जतेच्या पातळीवर

76
DCM Eknath Shinde यांचा आपत्ती व्यवस्थापनावर भर; म्हणाले, राजकारण करणाऱ्यांना...
  • प्रतिनिधी

“आपत्तीमध्ये काम करणे हेच आमचे प्राधान्य असून, राजकारण करणाऱ्यांना उत्तरं देण्यात वेळ वाया घालवणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी सोमवारी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन तंत्रसुसज्ज यंत्रणांचा आढावा घेतला.

राज्यात सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली. उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी कार्य केंद्रातील प्रशिक्षित तज्ञ कर्मचाऱ्यांशी संवाद साधला, तांत्रिक यंत्रणा कशा कार्यरत आहेत याचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले. “हे केंद्र तंत्रज्ञानाने सुसज्ज असून कोणत्याही आपत्तीला वेळेत आणि प्रभावीपणे तोंड देणे शक्य होणार आहे,” असे ते म्हणाले.

(हेही वाचा – Veer Savarkar :   डॉ. विजय जोग यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्काराने गौरव; म्हणाले, “मी मार्क्सवादी तरी सावरकरप्रेमी, कारण…”)

९.५ कोटी नागरिकांना अलर्ट, राज्य सज्ज

मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी यांनी यावेळी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरातील ९.५ कोटी नागरिकांना पावसासह संभाव्य विजा पडण्याचे अलर्ट वेळेत पाठवण्यात आले आहेत. ठाणे, रायगड, मुंबई, पुणे या जिल्ह्यांतील घाट विभागात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, एनडीआरएफ पथके, जिल्हा प्रशासन व पालिकांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – Mahim Building Collapse: मुंबईत जोरदार पाऊस; माहीममध्ये इमारतीचा भाग कोसळला)

“ठाण्याच्या धर्तीवर प्रतिसाद पथके सर्वत्र”

आपत्ती व्यवस्थापनाची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी “ठाणे पॅटर्न” सर्व महानगरपालिकांत लागू करण्याचे निर्देश नगरविकास प्रधान सचिव डॉ. गोविंदराज यांना दिले. “कोकणात सौम्यीकरणाच्या योजनांचा आढावाही घेतला असून त्यात गती येणार,” असे उपमुख्यमंत्री शिंदे (DCM Eknath Shinde) यांनी नमूद केले.

(हेही वाचा – Ashish Shelar यांचा शिवसेना उबाठावर घणाघात; म्हणाले, ३ लाख कोटींचा लुटीचा बाजार मांडला…)

कर्मचाऱ्यांचे कौतुक, अडचणी तत्काळ दूर करण्याचे निर्देश

२४ तास कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत, “त्यांच्या निवास आणि अडचणींबाबत तत्काळ कार्यवाही करा,” अशा सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन सोना, मदत व पुनर्वसन विभागाचे अधिकारी सतीशकुमार खडसे आणि आपत्ती कार्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण राज्याला सज्ज ठेवणाऱ्या या कार्यपद्धतीमुळे आपत्तींना सामोरे जाण्यास शासन आता अधिक सक्षम झाले आहे, हे उपमुख्यमंत्र्यांच्या (DCM Eknath Shinde) ठाम आणि कृतीशील भूमिकेतून स्पष्ट झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.