-
प्रतिनिधी
केंद्र सरकारने आगामी जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी जाहीर स्वागत केले आहे. या निर्णयामुळे सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे ध्येय वेगाने साध्य होईल आणि भविष्यात जातव्यवस्था संपुष्टात येण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, या क्रांतीकारी निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळाचे त्यांनी आभार मानले आहेत.
(हेही वाचा – सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत कर्मचाऱ्यांचा Khaki Uniform; 1 मेपासून अंमलबजावणी)
जातनिहाय जनगणनेच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) म्हणाले, “हा निर्णय सामाजिकदृष्ट्या दुर्बल, वंचित आणि उपेक्षित समाजघटकांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे सरकारला मागास समाजघटकांसाठी अधिक निधी देऊन त्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. सर्व समाजघटकांना त्यांचा न्याय्य हक्क मिळेल आणि सामाजिक समतेच्या दिशेने एक मोठे पाऊल पडेल.” या निर्णयाला त्यांनी सामाजिक समतेसाठी केंद्र सरकारने टाकलेले क्रांतीकारी पाऊल असे संबोधले.
(हेही वाचा – Super Cabinet Meeting : ८८ वर्षांनंतर देशात होणार जातनिहाय जनगणना, केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय)
उपमुख्यमंत्री पवार (DCM Ajit Pawar) पुढे म्हणाले, “गेल्या अनेक दशकांपासून अनेक व्यक्ती, संस्था आणि संघटना जातनिहाय जनगणनेची मागणी करत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारख्या संवेदनशील नेतृत्वामुळे ही मागणी पूर्ण झाली. आतापर्यंत अनुसूचित जाती, जमाती वगळता इतर जातींची आर्थिक आणि सामाजिक माहिती उपलब्ध नव्हती, ज्याचा फटका ओबीसींसह इतर समाजघटकांना बसत होता. आता या निर्णयामुळे केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना योग्य समाजघटकांपर्यंत पोहोचतील आणि सर्वांना समान संधी मिळतील.” यामुळे भविष्यात जातव्यवस्था संपुष्टात येण्यासही मदत होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. या निर्णयामुळे सामाजिक समतेसाठी नवे दालन खुले होईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community