DCM Ajit Pawar यांचा पुढाकार! बीड जिल्ह्यात १९१ कोटींची ‘सीआयआयआयटी’ स्थापन

टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

82
निवृत्ती घ्या, नवं नेतृत्व तयार करा; Ajit Pawar यांनी नक्की कोणाला दिला सल्ला ?
  • प्रतिनिधी

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी पुढाकार घेत ‘सेंटर फॉर इन्व्हेंशन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अॅन्ड ट्रेनिंग’ (सीआयआयआयटी) स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत ‘टाटा टेक्नॉलॉजी’ कंपनीने या प्रकल्पासाठी १९१ कोटी रुपये खर्चण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने यासंदर्भात अजित पवार (DCM Ajit Pawar) यांना पत्र पाठवून सहकार्याची तयारी दर्शवली आहे. या केंद्रामुळे बीडमधील युवकांना औद्योगिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, जिल्ह्यात उद्योगपूरक वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

(हेही वाचा – BMC : केंद्राच्या अधिनियमांची अंमलबजावणी; पण मार खाते महापालिका)

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी बीड जिल्ह्याची सूत्रे हाती घेतली. २ एप्रिल २०२५ रोजी बीड दौऱ्यादरम्यान त्यांनी ‘सीआयआयआयटी’ स्थापनेची घोषणा केली होती. युवकांना औद्योगिक प्रशिक्षण, तांत्रिक कौशल्यविकासाद्वारे उद्योगक्षम बनवून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा या केंद्राचा उद्देश आहे. यासाठी अजित पवार यांनी ‘टाटा टेक्नॉलॉजी’ला पत्र लिहून सहकार्य मागितले होते.

(हेही वाचा – Rajasthan मधील गणेश मंदिरात आला वाघ; जबड्यात उचललेल्या मुलाला पाहून भाविकांचा थरकाप)

‘टाटा टेक्नॉलॉजी’ने सकारात्मक प्रतिसाद देत १९१ कोटींचा प्रकल्प हाती घेतला. यापैकी १५ टक्के (३३ कोटी) खर्च बीड जिल्हा प्रशासन करणार असून, उर्वरित खर्च टाटा टेक्नॉलॉजी आणि त्यांच्या भागीदार संस्था उचलणार आहेत. या केंद्रातून दरवर्षी ७ हजार युवकांना जागतिक दर्जाचे औद्योगिक प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळेल आणि युवकांना रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी खुल्या होतील. अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्या निर्णयक्षम कार्यपद्धतीचा हा आणखी एक दाखला आहे. बीडवासीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ते कटीबद्ध असल्याचे दिसते. हा प्रकल्प बीडच्या औद्योगिक प्रगतीसाठी मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.