Shiv Sena Dasara Melava आणि ६० लाखांच्या खर्चाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर

शिवसेना दसरा मेळावा हा राजकीय पक्षाच्या मेळावा असल्यामुळे मैदानावर सर्व सेवा महापालिका वतीने पुरविण्यासाठी परवानगी देतानाच यासर्व सेवांचे शुल्क अदा करणे क्रमप्राप्त असते. मात्र दक्षिण मुंबईतील या मेळाव्यासाठी शिवसेनेने यासाठीचे सुमारे ६२ लाख रुपये महापालिकेला अदा करण्यात आली नाही. उलट महापालिकेच्या तिजोरीतून खासगी कंत्राटदारांना याचे पैसे द्यावे लागले.

1037
Shiv Sena Dasara Melava आणि ६० लाखांच्या खर्चाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर
Shiv Sena Dasara Melava आणि ६० लाखांच्या खर्चाचा भार महापालिकेच्या तिजोरीवर

मुंबई सलग दुसऱ्या वर्षी शिवसेनेचे दोन दसरा मेळावे (Dasara Melava) पार पडले. शिवसेनेचा दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदानावर आणि शिवसेना उबाठा गटाचा (UBT Group) दसरा मेळावा हा दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवतीर्थवर (Shivtirtha) पार पडला. त्यातील दक्षिण मुंबईतील शिवसेना दसरा मेळाव्यासाठी (Dasara Melava) तब्बल ९०० फिरत्या सार्वजनिक शौचालयांची सुविधा पुरविण्यात आली होती. आणि या सर्व फिरत्या सार्वजनिक शौचालयांचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना दसरा मेळावा हा राजकीय पक्षाच्या मेळावा असल्यामुळे मैदानावर सर्व सेवा महापालिका वतीने पुरविण्यासाठी परवानगी देतानाच यासर्व सेवांचे शुल्क अदा करणे क्रमप्राप्त असते. मात्र दक्षिण मुंबईतील या मेळाव्यासाठी शिवसेनेने यासाठीचे सुमारे ६२ लाख रुपये महापालिकेला अदा करण्यात आली नाही. उलट महापालिकेच्या तिजोरीतून खासगी कंत्राटदारांना याचे पैसे द्यावे लागले. (Shiv Sena Dasara Melava)

यंदा पुन्हा एकदा परंपरागत दसरा मेळावा (Dasara Melava) दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर घेण्यास शिवसेना उबाठा परवानगी देण्यात आल्याने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यनेता असलेल्या शिवसेनेने आपला दसरा मेळावा दक्षिण मुंबईतील क्रॉस मैदानावर घेण्यात आला. या मैदान सरकारच्या कार्यकक्षेत येत असल्याने या दसरा मेळाव्यासाठी परवानगी प्राप्त झाली. त्यानुसार मेळाव्याच्या आदल्या दिवशी आणि मेळाव्याच्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी शौचालयाची सुविधा पुरवण्यात आली. महापालिका ए विभागाने घनकचरा व्यवस्थान विभागाला सूचना करून या फिरत्या शौचालयाची सुविधा पुरविण्यास सांगितले. त्यानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रथम ५०० आणि त्यानंतर ४०० शौचालयाची सुविधा खासगी संस्थेमार्फत पुरवली. (Shiv Sena Dasara Melava)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी मतदारसंघनिहाय नियोजन करा)

सुमारे ६० लाख रुपये खर्च

या दसरा मेळाव्यानिमित्त (Dasara Melava) २३ व २४ ऑक्टोबर २०२३ या दोन दिवशी या फिरत्या अर्थात पोर्टेबल टॉयलेट्सची व्यवस्था करण्यात आली होती. महापालिकेने सक्षम इंटरप्राईजेस यांच्याकडून ५०० पोर्टेबल टॉयलेट्स आणि शारदा सेफ्टीवर्क्स यांच्याकडून ४०० पोर्टेबल टॉयलेट्स आदींची सेवा भाडेतत्त्वावर घेतली होती. यासाठी अनुक्रमे ३३ लाख १५ हजार आणि २६ लाख ५२ हजार अशा प्रकारे सुमारे ६० लाख रुपये खर्च केले आहेत. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे )यांच्या मंजुरीने हा खर्च करण्यात आला आहे. २३ आणि २४ ऑक्टोबर २०२३ रोजी ही सेवा घेण्यात आली असली तरी यासाठी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) यांची परवानगी ही २६ ऑक्टोबर २०२३ रोजी प्राप्त झाली होती. (Shiv Sena Dasara Melava)

यापूर्वी म्हणजे सन २०२२ मध्ये बीकेसी येथील दसरा मेळावा (Dasara Melava) करताना पोर्टेबल टॉयलेट्सची व्यवस्था महापालिकेच्या एच पूर्व विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन आदींच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि याचाही खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्यात आला होता, असेही प्रशासनातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दादर छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित दसरा मेळावा (Dasara Melava) शिवसेना उबाठा (UBT) यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता, त्याठिकाणी महापालिकेचे स्वतःचे शौचालयाची सेवा दिली होती, त्यामुळे त्याकरता असलेले शुल्क परवानगी सोबत आकारले होते असे महापालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (Shiv Sena Dasara Melava)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.