अमेरिकेत गॅरन्टेक्स नावाची क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) चालवणार्या अलेक्सेई बेशिओकोव्ह (Alexei Beshokov) याला केरळ पोलिसांनी अटक केली आहे. अलेक्सेई बेशिओकोव्ह (Alexei Beshokov) हा मूळचा रशियन (Russian) असून त्याने लिथुआनियाचे नागरिकत्व घेतले आहे. त्याने 96 अब्ज डॉलरची क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज चालवली. त्याद्वारे दहशतवादी गट, अमली पदार्थ तस्कर आणि सायबर गुन्हेगारांना (Cyber Criminals) चलन पुरवठा करण्यास मदत केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
( हेही वाचा : bhandardara camping : भंडारदरा इथे भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ कोणता?)
अलेक्सेई बेशिओकोव्ह (Alexei Beshokov) याला झालेली अटक अमेरिकेच्या नेतृत्वाखालील एका तीव्र शोधमोहिमेचा भाग आहे. गेल्या आठवड्यात या प्रकरणात मोठी कारवाई झाली. त्या क्रिप्टो एक्स्चेंजवर नियंत्रण मिळवण्यात आले. तसेच 26 दशलक्ष इतकी संपत्ती जप्त करण्यात आली आणि बेशिओकोव्ह व त्याच्या एका सहकार्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. बेशिओकोव्हची (Alexei Beshokov) अटक म्हणजे गुन्हेगारांना रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. ही कारवाई जागतिक गुन्हेगारी आणि दहशतवादाला मिळणार्या आर्थिक मदतीवर कठोर नियंत्रण ठेवण्याच्या अमेरिकेच्या (America) धोरणाचा एक भाग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.
अमेरिका बेशिओकोव्हचे (Alexei Beshokov) व्हर्जिनिया (Virginia) येथे प्रत्यार्पण करण्याचा प्रयत्न करणार आहे. जर हे प्रत्यार्पण यशस्वी झाले, तर आंतरराष्ट्रीय मनी लाँडरिंग नेटवर्कवर कारवाई करण्याच्या लढ्यात मोठे यश मिळेल, असे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या मते, बेशिओकोव्ह (Alexei Beshokov) हा रशियामध्ये वास्तव्यास होता; पण तो भारतात का आला होता याचे नेमके कारण समजू शकले नाही. भारतात, केरळ पोलिसांनी त्याला अटक केली आहे. भारतीय केंद्रीय अन्वेषण विभागाने बेशिओकोव्हला (Alexei Beshokov) फरार आरोपी म्हणून संबोधले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाच्या प्रवक्त्या निकोल नावास ऑक्समन यांनी अटकेला दुजोरा दिला. (Alexei Beshokov)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community