रायगडमध्ये दरड  कोसळली; धामणीत रस्ता खचला; मान्सूनपूर्व पावसातच Mumbai-Goa Highway ची परवड 

494
मुंबई-गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) मागे जे काही शुक्ल काष्ट लागले आहे, ते काही कमी होण्याचे नाव घातले जात नाही. एक तपाहून अधिक काळ या महामार्गाचे काम सुरु आहे, तरीही हा महामार्ग अजून काही पूर्ण झालेला नाही, त्यातच अर्धवट अवस्थेत असलेल्या या महामार्गाची दर पावसाळ्यात पडझड होणे हे नित्याचे झाले आहे. शनिवारी पुन्हा हा महामार्ग ठप्प होण्याची शक्यता आहे. रायगड येथील बिरवाडी येथे महामार्गावर दरड कोसळली, तर संगमेश्वर येथील धामणी
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी येथे महामार्ग  (Mumbai-Goa Highway) खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संरक्षक भिंतीचे काम अर्धवट स्थितीत राहिल्याने पावसामुळे रस्ता खचण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे धामणी येथील रेल्वे ब्रीजच्या जवळ महामार्गावरील वाहतूक आता धोकादायक बनली आहे. आता प्रशासनाने याची दाखल वेळीच घेतली नाही तर मुंबई गोवा हा महामार्ग ठप्प होण्याची शक्यता आहे.
highway 1
मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वरमधील धामणी येथे रेल्वे ब्रीजच्या जवळ संरक्षक भिंतीचे सुरू असलेल्या रस्त्याचे काम सध्या बंद आहे. डिझेल तुटवडा असल्याने काम बंद असल्याची राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. आता ऐन पावसाळ्यात रस्ता खचल्यास महामार्गावरील वाहतूक बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.