Covid Vaccination : शुक्रवारपासून नाकावाटे घ्‍यावयाच्या इन्‍कोव्‍हॅक लसीकरण

इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) ही लस ६० वर्ष वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे.

183

मुंबईतील प्रत्येक विभागात एक लसीकरण केंद्र या प्रमाणे २४ लसीकरण केंद्रांवर, नाकावाटे घ्‍यावयाच्‍या इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीद्वारे कोविड – १९ प्रतिबंधक लसीकरण शुक्रवार, २८ एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात येणार आहे. ६० वर्षे वयावरील पात्र नागरिकांना, त्यांनी कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा Covid Vaccination घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपायुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) संजय कु-हाडे यांच्या निर्देशानुसार, मुंबई महानगरात कोविड संसर्ग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत महानगरपालिका आरोग्य प्रशासन सजगतेने कार्यरत आहे.

मुंबईत १६ जानेवारी २०२१ पासून कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरु झाली होती. प्रारंभी प्राधान्य गटांचे व त्यानंतर १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे कोविड लसीकरण Covid Vaccination करण्यात आले आहे. कोविड-१९ लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन/बूस्टर डोस) १० जानेवारी २०२२ पासून देण्यात येत आहेत. कालअखेर म्हणजे २६ एप्रिल २०२३ पर्यंत मुंबईत कोविड प्रतिबंधक लसीची पहिली, दुसरी आणि प्रतिबंधात्मक मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची एकूण संख्‍या २ कोटी २१ लाख ९६ हजार ९९५ इतकी आहे. यामध्‍ये पहिली मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या १ कोटी ८ लाख ९३ हजार ६७९ आहे. तर, दुसरी मात्रा घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या ९८ लाख १५ हजार ०२० इतकी आहे. प्रतिबंधात्मक डोस घेतलेल्‍या लाभार्थ्‍यांची संख्‍या १४ लाख ८८ हजार २९६ आहे.

(हेही वाचा Muslim Attack : हिंदू मुलांशी बोलते म्हणून मुसलमानांनी मुस्लिम तरुणीला भररस्त्यात केली मारहाण)

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार उद्या शुक्रवार, २८ एप्रिल २०२३ पासून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) ही लस ६० वर्ष वयावरील नागरिकांना प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून देण्यात येणार आहे. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिनची दुसरी मात्रा Covid Vaccination घेतल्यानंतर सहा महिन्यांनी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लसीची प्रतिबंधात्मक मात्रा घेता येईल. कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन व्यतिरिक्त दिलेल्या इतर कोणत्याही लसीसाठी प्रतिबंधात्मक मात्रा म्हणून इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लस देता येणार नसल्‍याचे देखील स्‍पष्‍ट करण्‍यात आले आहे.

मुंबईत २४ ठिकाणी इन्‍कोव्‍हॅक (iNCOVACC) लस स्थळ नोंदणी अर्थात ऑनस्पॉट नोंदणीद्वारे देण्यात येईल. २४ विभागातील सर्व लसीकरण केंद्रांची नावे व पत्ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ट्वीटर खात्यावर दररोज प्रकाशित करण्यात येतील. संबंधित पात्र मुंबईकर नागरिकांनी कोविड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा (प्रिकॉशन डोस) घ्यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.