गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी कोरोनाची तिसरी लाट आव्हानात्मक

108

गेल्या आठवड्यापासून कोरोनाच्या तिस-या लाटेचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असताना मंगळवारी राज्यात ८६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. परंतु मृत्यूंच्या संख्येपेक्षा मृत्यूदर आटोक्यात असल्याने घाबरु नका, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने नियुक्त केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी केले.

नव्याने ३३ हजार ९१४ रुग्णांची भर

गंभीर आजार असलेल्या रुग्णांना वाचवण्यात यंदा तिसरी लाटेत पुन्हा आव्हान ठरत असल्याची कबुली त्यांनी दिली. अगोदरच्या दोन लाटेतही हृदयविकार, किडनीचा आजार, कर्करोग, फुफ्फुसाशी संबंधित दमा, सीओपीडी सारख्या रुग्णांना वाचवण्यातच अपयश आले. आताचे मृत्यूही गंभीर आजार असलेल्या रुग्णांमध्येच असल्याचे डॉ. जोशी यांनी नमूद केले. राज्यात मृत्यूदर १.८७ टक्के हा दिलासादायक आहे. त्यामुळे तुम्हाला कोणता गंभीर आजार असेल, तर त्यावर नियंत्रण आणा, असे आवाहनही डॉ. जोशी यांनी केले. राज्यात आता नव्याने ३३ हजार ९१४ रुग्णांची भर पडल्याने आता सक्रीय रुग्णांची संख्या ३ लाख २ हजार ९२३ रुग्णांवर विविध भागांत उपचार सुरु आहेत. आज ३० हजार ५०० रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला.

(हेही वाचा राज्याच्या ‘या’ भागात थंडीच्या लाटेसारखी परिस्थिती)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.