Covid : कोरोनाचा नवीन विषाणू पसरण्याची शक्यता, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

साथीच्या आजाराच्या पहिल्या टप्प्यापेक्षा कमी चाचण्या होत असल्यामुळे मृत्यूची नेमकी संख्या नोंदवणे कठीण

97
Covid : कोरोनाचा नवीन विषाणू पसरण्याची शक्यता, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
Covid : कोरोनाचा नवीन विषाणू पसरण्याची शक्यता, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहे, असे आपल्याला वाटत असले तरीही जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाशी संबंधित एक नवीन माहिती प्रसिद्ध केली आहे.

कोरोनाचा ‘EG 5.1’ हा विषाणू जास्त प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल व्हावे लागू शकते आणि रुग्ण दगावू शकतो. यासंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालात डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, साथीच्या आजाराच्या पहिल्या टप्प्यापेक्षा कमी चाचण्या होत असल्यामुळे मृत्यूची नेमकी संख्या नोंदवणे कठीण आहे.

जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानात आतापर्यंत EG 5.1 व्हेरिएंटचे फक्त एक प्रकरण मे 2023 मध्ये नोंदवले गेले आहे. 19 जुलै 2023 ला EG 5.1 व्हेरिएंटचे बारकाईने निरीक्षण करण्यास सांगितले होते. यावरून येणाऱ्या काळात हा विषाणू जास्त प्रमाणात पसरण्याची शक्यता असल्यामुळे सावधगिरी बाळगण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

(हेही वाचा – Gaming Industry : विदेशी गेमिंग कंपन्यांकडून कोट्यवधींची कर चुकवेगिरी; सरकारचा अहवाल)

EG 5.1 व्हेरिएंट म्हणजे काय आणि त्याची लक्षणे …

– EG 5.1 हा विषाणू एरिस या नावाने ओळखला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Omicron variant family EG.5.1 ला वैरिएंट ऑफ इंटरेस्ट असे नाव दिले आहे. पुण्यातील बीजे गव्हर्नमेंट वैद्यकीय महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. राजेश कार्यकार्टे यांनी सांगितले की, ‘EG.5.1 हे Omicron व्हेरियंट XBB.1.9.2 चे उप-व्हेरियंट आहे. या विषाणूचे हे उपप्रकार 39 देश आणि 38 अमेरिकी राज्यांमध्ये आढळले आहेत.

पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी या संस्थेच्या संशोधकांनी सांगितले की, नवीन कोविड व्हेरिएंट हा चिंतेचा विषय असून त्याची उत्पत्ती XBB1.9 यापासून झाली आहे.हिंदुस्थानात याचा मोठा परिणाम दिसण्याची शक्यता आहे. आम्ही केलेल्या नव्या संशोधनानुसार, मे महिन्यात या सबव्हेरिएंटची एक केस आढळली होती, मात्र हा रुग्ण देशाबाहेरील आहे.

लक्षणे आणि त्यावरील उपाय
– घसादुखी, नाकातून पाणी येणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, अंगदुखी ही या आजाराची लक्षणे असून बहुतांश रुग्णांमध्ये ताप आणि श्वास घ्यायला त्रास होणे, अशा प्रकारची लक्षणेही आढळत आहेत.

– वयोवृद्ध व्यक्ती, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती किंवा गर्भवती महिलांनी या विषाणूबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

– लसीकरण, हात स्वच्छ धुणे, दोन व्यक्तिंमध्ये अंतर ठेवणे, जास्त गर्दी असलेली ठिकाणे टाळणे, मास्क वापरणे हे उपाय केल्यास या विषाणूपासून रक्षण होऊ शकते तसेच श्वासाशीसंबंधित कोणताही आजार असल्यास आजार बरा होईपर्यंत घरी राहून उपचार घेणे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.