पुण्यात 2025 मधील पहिला कोरोना रुग्ण (Covid 19) आढळला आहे. पुण्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. मुंबईनंतर आता पुण्यातही 87 वर्षीय वृद्धाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या रुग्णावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Covid 19)
यावर्षीचा हा पुण्यातील पहिलाच कोरोना रुग्ण असल्याचं आरोग्य विभागाने जाहीर केलं आहे. पुण्यात पहिला रुग्ण आढल्यानंतर आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही, असं स्पष्ट करत आरोग्य विभागाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचा पुनरुच्चार केला आहे. (Covid 19)
हेही वाचा- IPL 2025, Play-off Race : बाद फेरीचे ३ संघ ठरले; एका जागेसाठी लखनौ, मुंबई, दिल्लीत टक्कर
राज्याची राजधानी मुंबईमध्ये आतापर्यंत 53 कोरोना रुग्ण सापडले आहेत. सोमवारी, 19 मे रोजी एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. परंतु पुण्यामध्ये मात्र कोरोनाचा एक रुग्ण सापडल्याने आता खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. (Covid 19)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community