राज्यातील कोरोना (Corona Update) रुग्णांची संख्या ही वाढतच आहे. पुणे आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण असून, प्रत्येकी ३४ रुग्णांची नोंद झाली आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवडमध्ये १०, तर पुणे ग्रामीणमध्ये ४ करोना रुग्ण आढळून आले. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २४ तासांत करोनाचे ९८ रुग्ण आढळले. त्यात मुंबई ३४, पुणे महापालिका ३४, पिंपरी-चिंचवड महापालिका १०, पुणे ग्रामीण ४, ठाणे ४, सांगली महापालिका व छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रत्येकी ३, कल्याण महापालिका २, वसई विरार महापालिका, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर महापालिका प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे. (Corona Update)
हेही वाचा-Naxal Encounter: छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये चकमक; नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य सुधाकर ठार
राज्यात १ जानेवारी ते ५ जूनपर्यंत १४ हजार ५६५ संशयित करोना रुग्णांच्या (Corona Update) चाचण्या करण्यात आल्या. त्यात १ हजार १६२ रुग्णांना करोनाचे निदान झाले. त्यात मुंबईत सर्वाधिक ५७५ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील करोनाची सक्रिय रुग्णसंख्या ५४८ असून, ५९७ रुग्ण बरे झाले आहेत. (Corona Update)
हेही वाचा- Election Commission : नवी डिजिटल प्रणाली अंतर्गत इंडेक्स कार्ड व आकडेवारी अहवालांची वेगवान निर्मिती
राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत करोनाच्या १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १६ रुग्ण सहव्याधीग्रस्त होते. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मूत्रपिंडविकार, कर्करोग, ब्रेन स्ट्रोक, फुफ्फुस विकार, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, क्षयाचा आजार होता. राज्यात श्वसनविकाराच्या रुग्णांचे सर्वेक्षण सुरू असून, त्यांची करोना चाचणी केली जात आहे. (Corona Update)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community