ठाणे शहरात एका 21 वर्षीय तरुणाचा शनिवारी कोरोनामुळे (Corona Update) मृत्यू झाला. ठाणे महापालिकेने यासंदर्भात माहिती दिली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना साथरोगाचे 56 सक्रिय रुग्ण असल्याची माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. (Corona Update)
ठाण्यातील मृत तरुणाला गंभीर स्वरूपाच्या मधुमेहामुळे गुरुवारी (22 मे) रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाररत असताना शुक्रवारी (23 मे) रात्री त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज, शनिवारी सकाळी त्याचे निधन झाल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयचे अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली. (Corona Update)
हेही वाचा- Drugs : ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत नवी मुंबईत ४८ ठिकाणी छापे, ४० लाखांचे अमली पदार्थ जप्त
ठाणे महानगरपालिकेतील माहिती व जनसंपर्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज एकूण 9 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ठाण्यातील एकूण रुग्णसंख्या 19 वर गेली आहे. तर एकूण महाराष्ट्रात सध्या 56 सक्रिय रुग्ण आहेत. (Corona Update)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community