Mumbai Beautification : झोपडपट्टयांमध्ये पावसाळी गटारांची कामे करणारे कंत्राटदारही भित्तीचित्रे रेखाटू लागलेत

महापालिकेच्या वांद्रे ते साताक्रुझ पश्चिम या भागातील विविध ठिकाणी उंच इमारतींच्या भिंतीवर थ्रीडी भित्तिचित्रे काढून सुशोभिकरणाचा निर्णय घेतला आहे.

158
Mumbai Beautification : झोपडपट्टयांमध्ये पावसाळी गटारांची कामे करणारे कंत्राटदारही भित्तीचित्रे रेखाटू लागलेत
Mumbai Beautification : झोपडपट्टयांमध्ये पावसाळी गटारांची कामे करणारे कंत्राटदारही भित्तीचित्रे रेखाटू लागलेत

मुंबईत सुशोभीकरणाच्या नावाखाली भिंतीवर आकर्षक चित्र रेखाटून त्यांची रंगरंगोटी करण्यात येत असतानाच आता उंच इमारतीच्या भिंतीवरही थ्रीडी भित्तीचित्रे काढली जाणार आहे. मात्र, या कामांसाठी कलात्मक बाबींचा विचार न करता सिव्हिलची कामे करणाऱ्या कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे विभागांमध्ये सिव्हिलची कामे करणारे कंत्राटदारही सुशोभिकरणाच्या कामांमध्ये हात साफ करून घेताना दिसत आहे.

महापालिकेच्या वांद्रे ते साताक्रुझ पश्चिम या भागातील विविध ठिकाणी उंच इमारतींच्या भिंतीवर थ्रीडी भित्तिचित्रे काढून सुशोभिकरणाचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सादरीकरणाच्या अनुषंगाने सुशोभीकरण आणि नागरिकांच्या अधिक चांगल्या सेवा व सुविधा देण्यासाठी प्रभागातील प्रमुख ठिकाणे ओळखण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहे. त्यानुसार सुशोभिकरणांतर्गत भिंत पेंटिंगची कामे केली जात असून आता महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील उंच इमारतींच्या भिंतीवरही थ्रीडी भित्तीचे काढली जाणार आहे. या भित्तीचित्र काढण्यासाठी सुमारे ८३ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

(हेही वाचा – Mumbai Municipal Corporation : मुंबईतील बॅनर, फलकांवरील कारवाईत पक्षपात, मग कशी होणार मुंबईत बॅनरमुक्त!)

ही थ्रीडी भित्तीचित्रे काढण्यासाठी शितल इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीने यापूर्वी झोपडपट्टी सुधारणे अंतर्गत पर्जन्य जलवाहिनीची आरसीसीची कामे केली आहेत. त्यामुळे झोपडपट्टयांमध्ये पर्जन्य जलवाहिन्यांची कामे करणाऱ्या कंपनीच्या वतीने आता भित्तीचित्रे रेखाटली जाणार असून सिव्हीलची कामे करणारे कंत्राटदारही आता भित्तीचित्रे रेखाटण्याची कामे करत असल्याने नक्की कलात्मक कामे केली जातात की कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी अशी कामे निर्माण केली जातात असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.