Fighter चित्रपटात हवाई दलाच्या गणवेशाचा अवमान; दीपिका पदुकोण-हृतिक रोशनला नोटीस 

202

२५ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या Fighter हा सिनेमा वादात सापडला आहे. कारण या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि हृतिक  रोशन यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

काय आहे हे प्रकरण? 

बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांचा Fighter चित्रपट २५ डिसेंबरला प्रदर्शित झाला. हा चित्रपट चुंबन दृश्यामुळे वादात सापडला आहे. चित्रपटातील एका दृश्यात दीपिका आणि हृतिक हे एअरफोर्सच्या युनिफॉर्ममध्ये दिसत आहेत तेव्हा ते एकमेकांचे चुंबन घेत आहेत. आसाममध्ये तैनात असलेल्या विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी या दृश्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंदसह दीपिका आणि हृतिकला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. एअरफोर्स युनिफॉर्ममध्ये असे चुंबन करणे चुकीचे आहे. हा युनिफॉर्मचा अपमान असल्याचे सौम्यदीप दास म्हणाले. हवाई दलाचे युनिफॉर्म हे केवळ कापडाचा तुकडा नाही. हे आपल्या देशाच्या संरक्षणासाठी शिस्त आणि त्यागाची निशाणी आहे, असेही दास म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.