Shamli मध्ये ट्रेन उलटवण्याचा कट; रुळावर ठेवला लोखंडी पाईप

52

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शामली (Shamli) जिल्ह्यात एका ट्रेनला उलटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ट्रेनच्या रुळावर 10 मीटर लांब लोखंडी खांब ठेवण्यात आला होता. लोको पायलटनी वेळेवर इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबवली. त्यामुळे मोठा अपघात टळला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

(हेही वाचा – Mufti Tariq Masood : बंदी बनलेल्या भारतीय महिलांशी ४-४ लग्न होऊ शकतात का; पाकमधील मुलांचा संतापजनक प्रश्न)

ही घटना शनिवारी (३१ मे २०२५ या दिवशी) दिल्ली-सहारनपूर रेल्वे (Delhi-Saharanpur Railway) मार्गावर घडली. रात्री सुमारे १०:३० वाजता दिल्लीहून सहारनपूरकडे जाणाऱ्या एका पॅसेंजर ट्रेनच्या लोको पायलटला बलवा गावाजवळ ट्रेनच्या रुळावर एक लांब पाईप दिसला.

त्यानंतर लोको पायलटने तात्काळ इमर्जन्सी ब्रेक लावून ट्रेन वेळेत थांबवली. तपासणीत समोर आले की, रुळावर सुमारे १० मीटर लांब लोखंडी पाईप ठेवण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच जीआरपी, आरपीएफ आणि शामली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला.

या कटात सामील असलेल्या लोकांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या घटनेत कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.