26/11 Mumbai Attack मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता; माधव भंडारी यांचा घणाघाती आरोप

97

मुंबईवरील 26/11 च्या (26/11 Mumbai Attack) तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हात होता. मुंबई (Mumbai) शहरावर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसचा (Nationalist Congress) हात होता. मुंबईवर हल्ला होणार याची कल्पना सर्वांना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होणे अशक्य आहे, अशा घणाघाती आरोप भाजपा नेते माधव भंडारी (Madhav Bhandari) यांनी केला.

(हेही वाचा – Solapur जवळ चालत्या रेल्वेवर अज्ञाताने मारला दगड; चिमुकलीचा दुर्दैवी अंत)

माधव भंडारी यांच्या हस्ते पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या विक्रम भावे यांच्या ‘दाभोळकर हत्या व मी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या वेळी बोलताना त्यांनी उपरोक्त आरोप केला.

नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश व एम एम कलबुर्गी या हत्याकांडाद्वारे हिंदुत्त्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकर व सचिन अंदुरे यांना शिक्षा झाली. पण या प्रकरणी ते निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे माधव भंडारी म्हणाले.

गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न

माधव भंडारी पुढे म्हणाले, भारतात गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. देशात राजकीय बदल झाल्यानंतर व्यवस्थेमुळे हिंदुत्त्ववादी संघटनांना बदनाम केले जात आहे. कारण, व्यवस्था म्हणजे पोलीस, महसूल, न्यायव्यवस्था तीच आहे. ही व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे. (26/11 Mumbai Attack)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.