MHADA च्या सुमारे पाच हजार घरांची येत्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये संगणकीय सोडत; कारभारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न

609
MHADA च्या सुमारे पाच हजार घरांची येत्या सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये संगणकीय सोडत; कारभारात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

नागरिकांचे कार्यालयीन व्यवहार अधिक सोपे, सुलभ करण्याच्या उद्देशाने व लोकाभिमुख प्रशासनासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) मुंबईतील मुख्यालयात म्हाडा नागरिक सुविधा केंद्र, अभ्यांगत व्यवस्थापन प्रणाली, कार्यालय शोधक या सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या असून, म्हाडाचे संकेतस्थळ नवीन व अद्ययावत करण्यात आले आहे. या माध्यमातून म्हाडा कार्यालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार असून नागरिकांचा त्रास कमी होणार असल्याचे ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले. दरम्यान, म्हाडा मुंबई मंडळातर्फे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुमारे ५००० सदनिकांची संगणकीय सोडत काढली जाणार असल्याचे जयस्वाल यांनी स्पष्ट केले

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात आलेल्या म्हाडा नागरिक सुविधा केंद्र (Citizen Facilitation Center), अभ्यांगत व्यवस्थापन प्रणाली (Visitors Management System), कार्यालय शोधक (Office Locator) या सुविधा व म्हाडाचे नवीन व अद्ययावत संकेतस्थळ, प्रकल्प व्यवस्थापन कक्ष यांचे उद्घाटन ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी जयस्वाल बोलत होते.

(हेही वाचा – पोलिसांकडून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर आकसापोटी कारवाई; विहिंप Police आयुक्तालयावर काढणार मोर्चा)

म्हाडाचे (MHADA) स्कॅन केलेले सुमारे १५ कोटी कागदपत्रे, नस्त्या (संवेदनशील वगळून) सार्वजनिक केले जाणार असून ‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळावर येत्या आठ दिवसात अपलोड केली जाणार आहेत. यामुळे ‘म्हाडा’शी संबंधित विविध माहिती व दस्तऐवज नागरिकांना अधिक सुलभतेने एका क्लिकवर केवळ बघण्यासाठी वर्गवारीनुसार उपलब्ध होणार आहेत. याद्वारे ‘म्हाडा’ पारदर्शक कारभाराच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पाऊल टाकत असल्याचे ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी सांगितले.

नागरिकांचे दैनंदिन जीवन सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनिक विभागांकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार व राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार १०० दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यातील ‘सुकर जीवनमान’, ‘संकेतस्थळ’ या महत्त्वपूर्ण घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सदर सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिक केंद्रीत कारभार करण्यावर व नागरिकांना दिलासा देण्यासाठी म्हाडाचा भर राहणार असल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

(हेही वाचा – Elphinstone Bridge परिसरातील १९ इमारतींच्या रहिवाशांना त्याच ठिकाणी पुनर्विकसित घरे; महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय)

पडून राहिलेल्यांपैंकी साडेसात हजार सदनिकांची विक्री

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकासातील पुनर्वसन सदनिकांचा लवकरच लाभार्थ्यांना ताबा दिला जाणार आहे. म्हाडा मुंबई मंडळातर्फे येत्या सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुमारे ५००० सदनिकांची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. म्हाडाचे (MHADA) विक्री न झालेल्या सुमारे १९ हजार सदनिका विक्रीसाठी मोहीम राबविण्यात आली असून त्याद्वारे आतापर्यंत सुमारे सात हजार ५०० सदनिकांची विक्री झाल्याचे जयस्वाल यांनी सांगितले.

म्हाडाच्या कारभारात एआयचा वापर

कृत्रिम बुद्धिमत्ताद्वारे (Artificial Intelligence) म्हाडाच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. जयस्वाल म्हणाले की, नागरिकांकडून म्हाडा मुख्यालयामध्ये येणारे टपाल आता एकाच ठिकाणी म्हणजेच म्हाडा मुख्यालयाच्या गेट नंबर ४ वरील म्हाडा नागरिक सुविधा केंद्रामध्ये स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे म्हाडा (MHADA) कार्यालयात टपाल देण्यासाठी प्रवेशद्वारावर रांग लावणे, कार्यालयात गर्दी करणे, वेगवेगळ्या कार्यालयांचे टपाल त्या त्या कार्यालयात देणे आदी बाबी करण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या इमारतीत जाण्याची गरज नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.