व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ७ रुपयांची वाढ

144
व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ७ रुपयांची वाढ

ऑइल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ७ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे दिल्लीत १९ किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किरकोळ विक्री किंमत १,७७३ रुपयांवरून १,७८० रुपये प्रति सिलेंडर इतकी वाढली आहे. परंतु, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

दरमहिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल करत असतात. १ जून रोजीही व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ८३ रुपयांनी कमी झाली होती. त्यामुळे आता दरवाढ होणार नाही यामुळे सर्व सामान्य जनता सुखावली असतांनाच आज म्हणजेच मंगळवारी ४ जुलै रोजी तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली आहे. तब्बल ७ रुपयांनी ही दर वाढ केली आहे. यामुळे आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या आहेत. राजधानी दिल्लीत व्यावसायिक सिलेंडरची किरकोळ किंमत १७७३ रुपयांवरून १७८० इतकी झाली आहे.

(हेही वाचा – उद्धव ठाकरे यांनी बोलावली सर्व नेत्यांची बैठक)

सुदैवाने तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल केला नसल्याने सर्व सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत या पूर्वी एप्रिल, मे आणि जूनमध्ये कपात करण्यात आली होती. यानंतर मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली. त्यानंतर आज ७ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.