मुंबईतील पुराचा धोका टाळणार कोस्टल रोडची संरक्षक भिंत

164
मुंबईतील पुराचा धोका टाळणार कोस्टल रोडची संरक्षक भिंत
मुंबईतील पुराचा धोका टाळणार कोस्टल रोडची संरक्षक भिंत

दरवर्षी पावसाळा सुरू झाला की मुंबईकरांचे टेन्शन वाढते. पाण्याचा योग्य निचरा होत नसल्यामुळे मुंबईतील २५० किलोमीटरच्या रस्त्यांवरील ट्रॅफिक वाढते. ढगफुटी, पूर, वादळ, तुफान यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या अनेक घटना पावसाळ्याच्या चार महिन्यांत कानावर येतात. पण आता मुंबईतील पुराच्या समस्येचे निराकरण कोस्टर रोडची संरक्षक भिंत करणार असल्याचा दावा, मुंबई महापालिकेकडून करण्यात आला आहे. १११ हेक्टर क्षेत्रफळात पसरलेल्या या कोस्टल रोडवर भिंतीमुळे मुंबईतील पुराचा धोका टळणार आहे.

सागरी संरक्षक भिंत

प्रदूषण मुक्त प्रवासासाठी फायदेशीर ठरणाऱ्या मुंबई सागरी किनारा मार्गाच्या कामाने वेग धरला आहे. आतापर्यंत ७३.५० टक्के काम पूर्ण झाले आहे. सागरी किनारा मार्ग मरीन ड्राईव्हला वांद्रे वरळी सी -लिंकशी जोडणार आहे. या मार्गाची एकूण लांबी १०.५८ किलोमीटर इतकी आहे. भविष्यातील जीवित हानी टाळण्यासाठी कोस्टल रोडवर साडे आठ किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. मे २०२३ पर्यंत सात किलोमीटर लांबीच्या संरक्षक भिंतीची बांधणी पूर्ण झाली आहे.

(हेही वाचा – मुंबईत पाच ठिकाणी उभारणार धूळ नियंत्रण केंद्र; साडेदहा कोटींचा खर्च)

पालिकेचा दावा

आर्मर रॉक म्हणजेच बेसाल्ट खडकाचा वापर करून ही संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. या भिंतीमुळे सागरी किनारा मार्गाचे संरक्षण होणार आहेच, त्या शिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट होणार आहे. पालिकेने दावा केला आहे की, या संरक्षक भिंतीमुळे मुंबईतील पुराचा धोका टळेल.

अभेद्य भिंत

सध्या सात ते सव्वा सात किलोमीटरपर्यंतच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले आहे. बेसाल्ट दगडाचा वापर करून बांधलेली ही भिंत साधारण सहा ते नऊ मीटर उंच आहे. एक ते दोन टनांच्या दगडांचे दोन थर रचून भिंत बांधली जात आहे. वादळ, तुफान आणि पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रातील लाटांची उंची वाढते. ही भिंत बांधताना लाटाची सर्वोच्च पातळीही लक्षात घेण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.