Coastal Road : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार ‘कोस्टल रोड’चे लोकार्पण

धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील कमाल वेग मर्यादा सरळ रस्त्यावर ८० किमी प्रतितास, बोगद्यात ६० किमी प्रतितास आणि वळण आणि प्रवेश/निर्गमन बिंदूवर ४० किमी प्रतितास आहे.

152
Coastal Road Project ची अडवणूक कोणी केली, फडणवीस यांनी कुणाकडे दाखवले बोट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज म्हणजेच सोमवार ११ मार्च रोजी मुंबईच्या कोस्टल रोडचे (Coastal Road) उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित असणार आहेत. विशेष म्हणजे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार अरविंद सावंत यांना देखील आजच्या उद्घाटन सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

(हेही वाचा – राहुल गांधी मानसिक संतुलन बिघडलेले; काँग्रेस बुडणारे जहाज; Acharya Pramod Krishnam यांची घणाघाती टीका)

काही दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवार ७ मार्च रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोस्टल रोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या (Coastal Road) बांधकामाची पाहणी केली होती.

कोस्टल रोड वाहतुकीसाठी अंशतः खुला :

जलद वाहतुकीसाठी बांधण्यात आलेला धरमवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्ग (मुंबई कोस्टल रोड) खान अब्दुल गफ्फार खान रोड आणि बिंदू माधव ठाकरे जंक्शन ते मरीन ड्राइव्ह (प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज) दक्षिण सीमेवरील वाहनांच्या वाहतुकीसाठी अंशतः खुला करण्यात येईल, असे अधिकृत वाहतूक अधिसूचनेमध्ये मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. (Coastal Road)

(हेही वाचा – Ajit Pawar : कसली रे कोयता गँग, सुपडाच साफ करतो; अजित पवारांनी दिली तंबी)

सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीस परवानगी :

सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहनांच्या वाहतुकीला परवानगी असेल. तर शनिवार आणि रविवार या दोन दिवशी हा मार्ग बंद (Coastal Road) असेल. तसेच वाहने थांबवणे आणि वाहनातून बाहेर पडणे आणि मार्गावर छायाचित्रे काढणे किंवा व्हिडिओ घेणे यावर सक्त मनाई आहे.

कोस्टल रोडवर वेग मर्यादा : 

धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील (Coastal Road) कमाल वेग मर्यादा सरळ रस्त्यावर ८० किमी प्रतितास, बोगद्यात ६० किमी प्रतितास आणि वळण आणि प्रवेश/निर्गमन बिंदूवर ४० किमी प्रतितास आहे.

(हेही वाचा – Supriya Sule : बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर)

‘या’ वाहनांना प्रवेश बंद :

कोस्टल रोडवर (Coastal Road) अवजड वाहने, ट्रेलर, मिक्सर, ट्रॅक्टर, अवजड मालवाहू वाहनांना (BEST/ST बसेस आणि प्रवासी वाहतूक करणारी वाहने वगळून) आणि सर्व मालवाहक वाहनांना प्रवेश नसेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.