तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुर्गम भागांत आरोग्य सेवा पोहोचवा; CM Devendra Fadnavis यांचे आवाहन

72
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दुर्गम भागांत आरोग्य सेवा पोहोचवा; CM Devendra Fadnavis यांचे आवाहन
  • प्रतिनिधी

महाराष्ट्राला आरोग्य सेवांचे महत्त्वपूर्ण केंद्र बनवण्याचा प्रयत्न सुरू असून, दर्जेदार आरोग्य सेवा समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत, विशेषतः अतिदुर्गम भागांत पोहोचली पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केले. तंत्रज्ञान आणि डॉक्टर, तज्ञ यांच्या सहाय्याने हे शक्य आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. २२व्या मुंबई लाइव्ह इंडोस्कोपी अवॉर्ड २०२५ च्या वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी डॉ. अमित मायदेव, डॉ. तरंग ग्यानचंदानी आणि देश-विदेशातील डॉक्टर उपस्थित होते.

(हेही वाचा – Jain Temple Action : अखेर संबंधित सहायक आयुक्ताची बदली)

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “प्रत्येक व्यक्तीला सुलभ, परवडणारी आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात १० नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली असून, डॉक्टर आणि आरोग्यसेवकांची गरज वाढली आहे.” इंडोस्कोपी क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी यावेळी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील डॉ. राधिका चव्हाण यांना ‘वूमन इन इंडोस्कोपी’, चंडीगडच्या डॉ. सुरेंद्र राणा यांना ‘इंडोस्कोपी एज्युकेटर’, ओडिशाचे डॉ. आशुतोष मोहपात्रा यांना ‘लीडर फ्रॉम टायर २/३ सिटीज’, राजस्थानचे डॉ. मुकेश कल्ला यांना ‘लीडरशिप’, चंडीगडचे डॉ. जयंत सामंता यांना ‘इम्पॅक्टफुल पब्लिकेशन’, महाराष्ट्राचे डॉ. अमोल बापये आणि तेलंगणाचे डॉ. मोहन रामचंदानी यांना ‘टेक्निकल स्कील’ आणि महाराष्ट्राचे डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांना ‘इंडोस्कोपी फॉर सर्जन’ पुरस्कार प्रदान झाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.