-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबईतील प्रमुख रस्त्यांपाठोपाठ आता प्रार्थनास्थळ आणि परिसराची विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली असून पहिल्याच दिवशी २६ प्रार्थना स्थळांची स्वच्छता करून तेथील १४ टन कचरा आणि सुमारे दहा टन राडारोडा हटवण्यात आला आहे. मुंबई सखोल स्वच्छता मोहीम राबवण्यात आल्यानंतर प्रमुख मोठ्या रस्त्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. (Deep Cleansing Campaign)
यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आणि राडा रोडा हटवण्यात आला होता. त्यानंतर विशेष स्वच्छता मोहिमेच्या या टप्प्यात सोमवारी, १ एप्रिल ते शुक्रवारी ४ एप्रिल २०२५ दरम्यान आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, सोमय्या मैदान, अंधेरी क्रीडा संकुल, कोरा केंद्र (बोरिवली), मुलुंड क्रीडा संकूल क्रीडागण परिसराची स्वच्छता करण्यात आल्या नंतर आता मुंबईतील प्रमुख रस्त्यांपाठोपाठ आता प्रार्थनास्थळ आणि परिसराची विशेष स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. (Deep Cleansing Campaign)
या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २६ प्रार्थना स्थळांची आणि आसपासच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. यात मोहिमेत सुमारे साडे नऊ टन राडा रोडा, १४ टन कचरा आणि नऊ टन टाकावू, भंगार वस्तू जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. यासाठी २४ विभाग कार्यालयातील ८०१ स्वच्छता कर्मचारी आणि ५६ स्वयंसेवक तैनात होते. (Deep Cleansing Campaign)
पहिल्या दिवसातील स्वच्छता मोहीम
• २६ प्रार्थनास्थळे
• ९.६ टन राडारोडा
• १४.० टन कचरा
• ९.० टन टाकाऊ वस्तूंचे संकलन
• ६० संयंत्रे
• ८०१ स्वच्छता कर्मचारी
• ५६ स्वयंसेवक
हेही पहा –
Join Our WhatsApp Community