छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात दोन गटात वाद; दगडफेकीत सहा जण जखमी

111

छत्रपती संभाजीनगर येथील दोन गटामधील राड्याची घटना ताजी असतानाच शहरापासून जवळच असलेल्या ओहर गावात गुरुवारी रात्री दोन गटात वाद झाल्याचे समोर आले. या वादानंतर शुक्रवारी दगडफेकीची घटना घडली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच सध्या पोलिसांनी ओहर गावातील परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. शिवाय खबरदारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा ओहरमध्ये तैनात करण्यात आला आहे.

नक्की काय घडले?

छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी घडलेल्या घटनेनंतर गुरुवारी रात्री शहरापासून १२ किलोमीटर दूर असलेल्या ओहर गावात रामनवमीची मिरवणूक निघाली होती. या मिरवणुकीदरम्यान दोन गटात वाद झाला. हा वाद त्याच रात्री मिटवला गेला. पण शुक्रवारी सकाळी पुन्हा दोन गटात दगडफेक झाली. यावेळी संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आणि जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहर गावातील घटनेत दोन्ही गटातील दोन-दोन लोकं जखमी झाले आहेत. सध्या गावात शांतता पसरली आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

(हेही वाचा – मालवणी राडा प्रकरणी २० जणांना अटक; नक्की काय घडले?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.