Churchgate Station Fire : पश्चिम रेल्वेतील मुख्यस्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चर्चगेट स्थानकात आग लागली आहे. गुरुवारी ०५ वाजून ३० मिनिटांच्या दरम्यान चर्चगेट स्थानकामधीन केक शॉपला भीषण आग लागली आहे. या आगीमुळे चर्चगेट रेल्वेस्टेशनमध्ये धुराचे लोट पसरले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवले असून अग्निशमनकडून दलाकडून आग आटोक्यात आणली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रयत्न सुरु होते. मात्र पश्चिम लोकल सेवेवकर कोणताही परिणाम नाही. (Churchgate Station Fire)
अग्निशमन दलाचे जवान, पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले आहेत. आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी बरीच दुकानं आहेत. ती तातडीनं रिकामी करण्यात आली. परिसर मोकळा करण्यात आला. आग लागलेल्या दुकानात लाडकी फर्निचर असल्यानं आग काही मिनिटांत भडकली.
(हेही वाचा – bakrid-eid-al-adha : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वजीव मंगल प्रतिष्ठानची केंद्र सरकारकडे मागणी, अध्यक्ष डॉ. गंगवाल म्हणाले…)
चर्चगेट स्थानकात अनेक मोठमोठी आणि महत्त्वाची कार्यालयं आहेत. संध्याकाळच्या सुमारास कार्यालयातून चाकरमानी बाहेर पडतात. त्यामुळे संध्याकाळी चर्चगेट स्थानकात बरीच गर्दी असते. चर्चगेट स्थानकातूच विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकल सुटतात. वर्दळीची वेळी चर्चगेट स्थानकात आग लागल्यानं प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. नोकरीचा दिवस भरुन घराकडे निघालेल्या कर्मचाऱ्यांची काहीशी गैरसोय झाली आहे. तसेच आग विझवल्यानंतरही त्यामध्ये धुराचा लोट कायम राहिला होता. तसेच स्टेशनच्या संपूर्ण परिसरात हा धुराचा लोट कायम होता. अनेक प्रवाशांना तोंडाला रुमाल बांधून पुढे जावे लागल्याचं चित्र होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community