
-
ऋजुता लुकतुके
चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर अर्थात सीपीईसीचा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत करण्यावर या तीनही देशांमध्ये सहमती झाली आहे. मूळातच चीन आणि पाकिस्तान दरम्यानच्या कॉरिडॉरला भारताचा विरोध आहे. कारण, यातील बरंचसं बांधकाम हे पाकिस्तान शासित काश्मीरमध्ये केलेलं आहे. भारताने या भूभागावर दावा केला आहे. त्यातच आता चीन आणि पाकिस्तानला अफगाणिस्तान जाऊन मिळाला आहे. (China – Pakistan – Afghanistan Come Together)
ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच या तीन देशांमध्ये एक बैठक झाली. यात देशांनी या कॉरिडॉरला तत्त्वत: मान्यता दिली आहे. ‘पाकिस्तान, चीन आणि अफगाणिस्तान हे तीनही देश प्रादेशिक शांतता, स्थैर्य आणि विकास या मुद्यांवर एकत्र आले आहेत,’ असं पाकचे परराष्ट्र व्यवहारमंत्री इशक दर यांनी म्हटलं आहे. इशक दर सध्या ३ दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. तिथेच ही बैठक पार पडली आहे. (China – Pakistan – Afghanistan Come Together)
(हेही वाचा – IPL 2025, Virat Kohli : विराट आणि अनुष्का बनले संघ सहकारी; लखनौमध्ये रंगला पिकलबॉलचा खेळ)
Pakistan, China, and Afghanistan stand together for regional peace, stability, and development. pic.twitter.com/MX9fLJCG6L
— Ishaq Dar (@MIshaqDar50) May 21, 2025
भारताच्या दृष्टीनेही हा करार दूरगामी परिणाम करणारा आहे. कारण, यातील पाकिस्तान आणि चीन या दोन देशांच्या सीमा भारताशी जोडलेल्या आहेत. दुसरं म्हणजे पाकिस्तानची चीनबरोबर वाढलेली घसटही चिंतेची बाब ठरणार आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये नुकतीच शस्त्रसंधी झाली असली तरी त्या दरम्यान सीमेवर मोठी धुम:श्चक्री झाली. चीनचा पाकिस्तानला असलेला पाठिंबा तिथेही दिसला. पाकिस्तानने चीनकडून मिळालेली क्षेपणास्त्र या युद्धात वापरली. अर्थात, भारताने क्षेपणास्त्र, ड्रोन आणि रडार यंत्रणाही कुचकामी ठरवल्यामुळे सध्या भारताने आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे. पण, चीन आणि पाकिस्तानचे संबंध ही भारतासाठी डोकेदुखी आहेच. अशावेळी अफगाणिस्तान हा आणखी एक दक्षिण आशियाई देश दोघांना येऊन मिळाला आहे. (China – Pakistan – Afghanistan Come Together)
पाकिस्तानचं सरकार तिथल्या भूमीवर असलेले दहशतवादी तळ उद्धस्त न करता उलट त्यांना पैसे पुरवते, असा भारताचा आरोप आहे. तरीही चीनने पाकिस्तानला ‘सर्व प्रकारच्या हवामानातील मित्र,’ म्हणत नवीन मदत देऊ केली आहे. तर भारतावरील पहलगाम हल्ल्याचा निषेध करून आणि भारताने अफगाणिस्तानच्या दिशेनं क्षेपणास्त्र डागल्याचे पाकिस्तानचे आरोप फेटाळल्यानंतर अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार आता पाकिस्ताच्या बाजूने जात असल्यामुळे दहशतवाद विरोधी भूमिकेवरून त्यांनी यु-टर्न घेतल्याचंच हे द्योतक आहे. दक्षिण आशियाई देशांमध्ये सध्या अनेक मुद्यांवरून अस्थिरता दिसत आहे. (China – Pakistan – Afghanistan Come Together)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community