5 वर्षांखालील मुलांना मास्कची सक्ती आहे का? काय आहे केंद्राची नियमावली?

82

देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. दिवसागणिक वाढणारी कोरोना रुग्णसंख्या प्रशासनाच्या चिंतेत भर घालत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सरकार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि मार्गदर्शक तत्वे जारी करत असते. आता केंद्र सरकारने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, मुले आणि किशोरवयीन वयोगटासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

अशी आहेत मार्गदर्शक तत्वे…

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये 5 वर्षे आणि त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी मास्कची शिफारस नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेल्या सूचनेनुसार 6 ते 11 वयोगटातील मुले पालकांच्या देखरेखीत मास्कचा वापर करू शकतात, तर 12 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील मुलांनी मास्क वापरला पाहिजे, असे स्पष्टपणे मार्गदर्शक तत्वांमध्ये सांगण्यात आले आहे.

( हेही वाचा: ताडीच्या दुकानांनाही नागरिकांकडून होतोय विरोध! )

कोरोनाच्या तीव्रतेनुसार उपचार

कोरोना संसर्गाची तीव्रता लक्षात घेता, 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अँटीव्हायरल किंवा मोनोक्लोनल अँटीबॉडीज वापरण्याची शिफारस केलेली नाही. जर स्टिरॉइड्सचा वापर करत असाल, सुधारणेच्या आधारावर 10 ते 14 दिवसांमध्ये डोस कमी करावा, असे केंद्र सरकारने दिलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आले आहे. केंद्र सरकार वेळोवेळी मार्गदर्शक सूचना जारी करुन, राज्यांना निर्देश देत असते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.