Chief Minister Prays : राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांवरचे संकट दूर होवो, मुख्यमंत्र्यांची भीमाशंकरकडे प्रार्थना

आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

109
Chief Minister Prays : राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांवरचे संकट दूर होवो, मुख्यमंत्र्यांची भीमाशंकरकडे प्रार्थना
Chief Minister Prays : राज्यात चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांवरचे संकट दूर होवो, मुख्यमंत्र्यांची भीमाशंकरकडे प्रार्थना

बळीराजाचे संकट दूर होवो आणि राज्यभर समाधानकारक पाऊस पडावा.राज्यावरचे पाणीसंकट दूर होऊ राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे, राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान आणि आनंद मिळू दे, अशी प्रार्थना पुण्यातील भगवान भीमाशंकरकडे मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत् पूजा केली.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भाविक श्रद्धेने आणि भक्तिभावाने येथे दर्शनाला येत असतात. मी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावणी सोमवारी दर्शनासाठी आलो आहे. येथे लाखो भक्त येत असल्याने शासनाने 148 कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. आतापर्यंत त्यातील 68 कोटी विविध सुविधांवर खर्च करण्यात आला आहे. येथे येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही, अशा सर्व मूलभूत सुविधा शासनाच्या माध्यमातून दिल्या जातील. परिसरात स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि स्नानगृहाची व्यवस्था करण्याचे तसेच परिसरातील आदिवासी पाड्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

(हेही वाचा – G-20 summit : ममताचे जेवण काँग्रेसच्या जिव्हारी, काँग्रेसची आगपाखड; तृणमूलही भडकली )

पूजेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा भीमाशंकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आदी उपस्थित होते.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.