आता खड्डे बुजवण्याचे काम २४ तास चालणार

100
खड्डे बुजवण्यासाठी ‘एमएमआरडीए’ आणि ‘एमएसआरडीसी’ या दोन यंत्रणांनी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिले. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा चोवीस तास खड्डे बुजवण्याचे काम करेल. दर्जेदार अशी सामुग्री वापरून रेडीमिक्स पद्धतीने खड्डे भरण्यात यावेत. नियुक्त अधिकाऱ्यांची ही टीम रस्ते कोणत्या यंत्रणेचे हे न पाहता खड्डे भरेल. त्यासाठीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घेण्यात यावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, याची काळजी घ्या. वाहतूकीची कोंडी आणि खड्डे यातून लोकांना दिलासा देण्यासाठी काम करा. रस्ता कोणाचा आहे हे लोकांना माहित नसते. त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था होऊ नये यासाठी प्रयत्न करा. खड्ड्यांबाबत वाहतूक पोलिसांना चांगली माहिती असते. त्यामुळे खड्ड्यांबाबत पोलिसांकडून माहिती घेत राहा. पोलिसांनीही या यंत्रणांच्या संपर्कात राहून रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
( हेही वाचा: लोकभावना लक्षात घेऊन बाळासाहेबांऐवजी दि.बा. पाटलांचे नाव – मुख्यमंत्री )

वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करा
  •  महामार्गांवरील वाहतुकीचे नियमन करा. विशेषतः जेएनपीटी आणि अहमदाबादकडून येणाऱ्या वाहतूकीचे नियंत्रण करा. एमएमआरडीए क्षेत्रातील महापालिकांनी त्यांचे अंतर्गत रस्तेही खड्डे मुक्त राहतील, याची काळजी घ्यावी.
  • एकंदरच वाहतूक कोंडी दूर व्हावी, यासाठी रस्ते विकास प्रकल्प (रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट) राबवण्यात यावा. त्यासाठी दीर्घकालीन असे नियोजन करण्यात यावे. यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा.
  • बायपास, फ्लायओव्हर, अंडरपास, सर्व्हिस रोड अशा सर्व प्रकारचे नियोजनासाठी तज्ज्ञांकडून आराखडा तयार करून घेण्यात यावा.
  • यासाठी आवश्यक तिथे भूसंपादन आणि स्थानिक मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी,संबंधित महापालिका आयुक्तांनीही सहकार्य करावे.
  • एमएमआर क्षेत्रातील मुंबई शहरासह, ठाणे, नवी मुंबई तसेच शीळ फाटा, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी अशाच सर्वच परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरुपी अशा उपाय योजना करण्याबाबत प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.