‘Sanatan राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे’चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांना निमंत्रण

26

Sanatan : गोवा येथे होणाऱ्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’साठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना निमंत्रण देण्यात आले. या निमंत्रणप्रसंगी दोन्ही मान्यवरांनी महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आश्वासन सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी दिले. (Sanatan)

(हेही वाचा – Bulldozer Action Unauthorized Masjid : सिंधुदुर्ग जिल्हा अ‍ॅक्शन मोडवर; अनधिकृत मशिदीचा सुपडा साफ)

सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी गोव्यातील फोंडा येथील फर्मागुडी अभियंता महाविद्यालयाच्या प्रांगणात १७ ते १९ मे २०२५ दरम्यान होणाऱ्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ ची माहिती दिली.

या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले, “हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण आहे. मी याचा अवश्य लाभ घेईन.” या भेटीदरम्यान सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांच्यासमवेत महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यांचे राज्य संघटक सुनील घनवट, तसेच भाजपाचे नागपूर येथील आमदार व माजी मंत्री डॉ. परिणय फुके हेही उपस्थित होते.

(हेही वाचा – ग्रामीण रस्ते विकास विभागातील Corruption चव्हाट्यावर; कंत्राटदाराच्या घशात कोट्यवधी रुपये घालण्याची तयारी)

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेताना राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले (Minister Bharatsheth Gogawale) हेही उपस्थित होते. त्यांनाही निमंत्रण देण्यात आले असून ते देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवात देशभरातील संत, महंत, धर्माचार्य, विचारवंत आणि धर्मप्रेमी नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असून, सनातन राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून हा कार्यक्रम घडवला जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.