Gujarat Regional Council : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुजरातला रवाना, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार महत्त्वाची बैठक

गुजरातच्या गांधीनगर येथे क्षेत्रीय परिषदेचे आयोजन

127
Gujarat Regional Council : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुजरातला रवाना, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार महत्त्वाची बैठक
Gujarat Regional Council : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गुजरातला रवाना, गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार महत्त्वाची बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुजरातला रवाना झाले असून त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील गुजरातला रवाना झाले आहेत. अशी राजकीय वर्तुळातील एक मोठी बातमी समोर आली आहे. रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे परभणी दौऱ्यावर होते. त्यानंतर ते लगेचच गुजरातला रवाना झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात होते, मात्र त्या मागचे नक्की कारण काय हे समजू शकले नव्हते.

(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी रोजगार मेळाव्यात ५१ हजार तरुणांना जॉईनिंग लेटर देणार)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातच्या गांधीनगर येथे क्षेत्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीमध्ये शारीरिक शोषण आणि अत्याचार या प्रकरणाच्या तात्काळ चौकशी बाबत चर्चा होणार आहे तसेच पायाभूत सुविधा आणि पर्यावरण संदर्भात विषयांवर चर्चा होणार आहे. याचबरोबर शेजारी राज्यात परस्पर सहयोग निर्माण करण्याविषयी चर्चा होणार आहे. या बैठकीमध्ये महाराष्ट्रासह इतर राज्याचे प्रतिनिधीदेखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक प्रश्नांवर चर्चा होऊन ते मार्गी लागतील असे म्हटले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.