Chhatrapati Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांचा जयघोष आणि दिंडीमुळे जपानमध्ये झाले भारतीय संस्कृतीचे दर्शन

पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज पालखी मिरवणूक आणि वारकरी दिंडी काढण्यात आली.

159
Chhatrapati Shivaji Maharaj : जपानमध्येही शिवरायांची पालखी मिरवणूक, वारकरी दिंडी अन् भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन
Chhatrapati Shivaji Maharaj : जपानमध्येही शिवरायांची पालखी मिरवणूक, वारकरी दिंडी अन् भारतीय संस्कृतीचे प्रदर्शन

जपानची राजधानी टोकियोमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण’ कार्यक्रमाअंतर्गत अनेक जपानी आणि परकीय संस्थांनी स्वतःच्या संस्कृतींचे दर्शन घडवले. त्यामध्ये भारत कल्चरल सोसायटी जपान या संस्थेने वारकरी दिंडी, लेझीमसह शिवरायांची पालखी मिरवणूक काढत महाराष्ट्रीयन संस्कृतीचे मराठमोळे प्रदर्शन केले. इतिहासात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) पालखी मिरवणूक आणि वारकरी दिंडी काढण्यात आली.
टोकियो शहरामधील ओजिमा भागामध्ये, कोतो सिटीझन फेस्टिवल मध्ये मिरवणुकीमध्ये भारतीय महापुरुष आणि देवांविषयीचे मिरवणुकीतील प्रदर्शन पाहून परिसरातील फक्त भारतीयच नाही तर विदेशी नागरिक, विशेषतः जपानी नागरिक भारावून गेले.तब्बल १८० पेक्षा जास्त भारतीय सहभाग होता, त्यांनी २ किमी पेक्षा जास्त लांब मिरवणूक काढत मिरवणूक बघणाऱ्या जपानी नागरिकांची मनेही जिंकली.

(हेही वाचाRussia Praises India : रशियाने भारताकडून शिकण्यासारखे आहे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडून कौतुक )

विठ्ठल रखुमाईच्या भजनांनी टोकियोमधील वातावरणामध्ये, भारतीयांच्या उत्साहाने भरून गेलेल्या टाळ्या आणि भाषा समजत नसली तरी जपानी लोकांनी टाळ्या वाजवत कौतुक केलंय. “जय जय” काराने त्यात अजूनच भर पडली आणि मिरवणुकीला अजून गोडी आली. सजवलेल्या पालखीत महाराजांची सुरेख मूर्ती, मावळ्यांच्या कपड्यातील पालखी वाहणारे, डोक्यावर विठ्ठल-रखुमाईची मूर्ती, तुळशी वृंदावन, टाळ-मृदूंगाच्या तालावर नाचणारे वारकरी, नऊवारी साड्यांमधील महिला, पारंपरिक वेशभूषेतील मुले आणि पुरुष, वयस्कांबरोबरच लेझीम खेळणारी लहान मुले, लाठी-काठी प्रात्यक्षिक, असंख्य फेटे, तिरंगी झेंडे आणि भगवे झेंडे असे सर्व काही या मिरवणुकीत समाविष्ट करण्यात आले होते.त्यामुळे जपान मध्ये काही काळासाठी संपूर्ण भारतीय वातावरण अवतरले होते.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.